मो. पो.नाईक संदीप वानखेडेपोस्ट उत्कृष्ट कामगिरीबद्दल गुणगौरव

मुक्ताईनगर प्रतिनिधी
मुक्ताईनगर पोलीस नाईक संदीप वानखेडे यांची उत्कृष्ट गुन्हे तपास कामगिरी बद्दल माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकृष्णांत पिंगळे साहेब यांच्याकडून गौरव करण्यात आला.
मुक्ताईनगर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांच्या अंतर्गत असलेले असलेल्या गुन्हे शाखा संदर्भात कामगिरी करणारे संदीप वानखेडे हे मुक्ताईनगर पोलीस स्टेशन येथे गेल्या दोन वर्षापासून कार्यरत असलेल्या या टेबलवरील काम करत असताना अतिशय उत्कृष्ट पद्धतीने काम करत आहे व प्रलंबित असलेले गुन्हे लवकरात मार्गी लावलेले असल्याने त्यांचे मुक्ताईनगर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या माध्यमातून उत्कृष्ट पद्धतीने कामगिरी केल्याबद्दल त्यांचा गुणगौरव व स्वागत करून प्रशस्तीपत्र दिले आणि त्यांना सन्मानित करण्यात आले पुढील काम अशाच पद्धतीने करावे अपेक्षा ठेवून काम करतील अशी आशा बाळगलेली आहे.



