जळगावा जिल्हापत्रकारमहाराष्ट्रमुक्ताईनगर

प्रताप सरनाईक यांचे आदेश धाब्यावर – जळगाव आरटीओ विभागाची कारवाई शून्य RTO विभागाकडून वरिष्ठांच्या आदेशाचे पाय मल्ली

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

मुक्ताईनगर, ता. 10 जून:
राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ट्रेड सर्टिफिकेट नसलेल्या दुचाकींची विक्री करणाऱ्या शोरूम्सवर तत्काळ कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. मात्र, या आदेशांची अमलबजावणी करण्यात जळगाव आरटीओ विभाग पूर्णपणे अर्थपूर्ण अपयशी ठरला आहे.

विशेष मुक्ताईनगर येथील ओम श्री मोटर्स हिरो शोरूम संदर्भात वारंवार वृत्त प्रकाशित होऊनही आजतागायत कोणतीही कारवाई झालेली नाही.RTO अधिकाऱ्यांनी त्यांना उलट वेगळी शक्कल लढवत चौधरी मोटर्स नावाने फलक लावण्याचे आले आहे भुसावळ येथील चौधरी मोटर्स यांना दुचाकी विक्री परवाना 175 नंबरचे ट्रेड सर्टिफिकेट मिळाले आहे व त्याच नंबरच्या गाड्या मुक्ताईनगर मध्ये सुद्धा विक्री होत आहे मुक्ताईनगर चं काय बोदवड, यावल, सावदा, रावेर एकच ट्रेड सर्टिफिकेट च्या गाड्या अनेक ठिकाणी कशा विकल्या जाऊ शकतात आरटीओ विभागाचा नियम 1989 च्या 44 नुसार एका जागेचे एकच ट्रेड सर्टिफिकेट असते व एकाच ठिकाणी दुचाकी विक्री करू शकतात परंतु एकाच जागेवर एकाच पत्त्यावर एकाच नावाने अनेक ठिकाणी एकापेक्षा जास्त व्यवसाय प्रमाणपत्र देण्यात आले आहे आरटीओ विभाग असे परवाने देतात तरी तसे असा प्रश्न उपस्थित होत आहे यावरून आरटीओ विभागाच्या ढिसाळ कारभाराचे व वशिल्याधिष्ठित प्रशासनाचेच दर्शन घडत असल्याचे दिसून येत आहे

विशेष

माहिती अधिकार यांना चुकीची माहिती देणारे माहिती अधिकारी Rto

175 डीलर्स आहे की सब डीलरची आहे याचा समभ्रम

ग्राहकांची आर्थिक पिळवणूक

कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे हे बेनामी शोरुम

बनावट स्टेट सर्टिफिकेट चा आधारे आरटीओ विभागाने तपासणी दरम्यान कारवाई का केली नाही आरटीओ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार मुक्ताईनगरला जे ट्रेड सर्टिफिकेट दिले आहे ते रिन्यूअल 31 जुलै 2025 केलेलं आहे ते सुद्धा बनावट जागेचे आहे

गट क्रमांक 576 प्लॉट क्रमांक 3/1 या जागेचे ट्रेड 047 नंबरचे असून त्या जागेवर 28 मार्च 2021 पासून याच जागेवर HDFC बँक व राजश्री शाहू मल्टी को बँक चालू आहे व हे ट्रेड 047 नंबर चे असून या ठिकाणी 175 ट्रेड नंबर च्या गाड्या विकल्या जातात आरटीओ विभागाने तरीदेखील 2021 या ट्रेड ला रिनिव्हल 31 जुलै 2025 पर्यंत करून दिले आहे त्या जागेवर कुठलेही शोरूम नाही तर मागील तक्रार कर्त्याच्या म्हणण्यानुसार गट क्रमांक 561 /1/2/38 पत्त्यावर सुरू असून जितेंद्र सरोदे या मालकाची ही जागा असून कुठलेही व्हेरिफिकेशन न करता रिन्यूअल नेमके कुठल्या आधारे केले आर्थिक संबंधापोटी की राजकीय दबाव ?

ट्रेड सर्टिफिकेट शिवाय दुचाकी विक्री करणे हे कायद्याने गुन्हा असून, या प्रकारामुळे ग्राहकांची फसवणूक होण्याची शक्यता अधिक असते. त्याचप्रमाणे शासन महसुलालाही तोटा सहन करावा लागतो. तरीदेखील जळगाव आरटीओ विभागाने मंत्री सरनाईक यांच्या आदेशांना केराची टोपली दाखवत कारवाई टाळल्याचे स्पष्ट दिसून येत आहे .

या प्रकरणी स्थानिक नागरीकांत तीव्र नाराजी असून, संबंधित अधिकाऱ्यांवर तातडीने शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

शासनाने दिलेल्या आदेशांची पायमल्ली करणाऱ्यांविरुद्ध कोणतीही कारवाई होत नसेल, तर कायद्याचा धाकच उरणार नाही, अशी टीका देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर होत आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button