तेल्हारा एस. टि.आगार ची धक्कादायक माहिती उघड!मर्यादेपेक्षा जास्त प्रवाशांची होत आहे वाहतूक.!बसच्या कमी फेऱ्या व बसेसच्या कमतरतेमुळे प्रवाशांना जागा मिळवण्यासाठी करावा लागत आहे चुकिच्या मार्गाचा अवलंब! अनेक महिला, जेष्ठ प्रवाशांना करावा लागत आहे उभ्याने प्रवास.!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस विजय म घोडे ,अकोला जिल्हा प्रतिनिधी
तेल्हारा. | अकोला जिल्ह्यात येत असलेल्या तेल्हारा तालुक्याची धक्कादायक बातमी उघड झाली आहे . तेल्हारा आगारातून अकोला , अकोट ,शेगाव ,जळगाव श्री. छत्रपती संभाजी म. नगर आदी मोठ-मोठ्या शहरात बसेस जातात परंतु या मार्गावर बस फेऱ्यांची कमतरता असल्यामुळे तसेच प्रवासी संख्या जास्त असल्यामुळे प्रवाशांना अनेक तास बसची वाट बघावी लागत आहे .काही मार्गावर प्रवाशांची बस फेऱ्या वाढवण्याकरिता मागणी असताना सुद्धा बसेस किंवा बसच्या फेऱ्या वाढत नसल्याची गंभीर माहिती प्रवाशांकडून उघड झाली आहे.












तसेच बस मधील सीटांची क्षमता हि मर्यादित असून सुद्धा मर्यादेपेक्षा जास्त प्रवाशांना बसमध्ये वाहून नेण्यात येत आहे. अशा स्वरूपाची धक्कादायक बातमी तेल्हारा आगारची उघड झाली आहे.
प्रवास करत असताना ज्या गावाला बस जात आहे त्या गावचे बोर्ड नेमुन दिलेल्या ठराविक ठिकाणी बोर्ड लावावे लागते हे माहीत असताना सुद्धा
अनेक बसेसला बोर्ड लागत नाही. यामुळे हा शिक्षित प्रवाशांना त्रास तर होतोच याबरोबरच सु-शिक्षित प्रवाशांना सुद्धा त्रास होत आहे . त्यांना बस स्थानाकावर उपस्थित असलेल्या इतर प्रवाशांना विचारावे लागते आहे की , “ही बस , कोणत्या गावाला जात आहे.”? असे दुर्दैव तेल्हारा आगाराचे असून हि बाब संपूर्ण पंचक्रोशीत वाऱ्यासारखी पसरलेली आहे.
एकीकडे बसेस वाढवण्याची गरज असतांना सुद्धा बस वाढत नाही. अनेक वेळा बस वाढवण्याबाबत मागणी हि झालेली आहे परंतु बस वाढत नसल्याची निंदनीय बाब ही ऊघड झाली आहे. या बस कमतरतेमुळे प्रचंड गर्दी तेल्हारा बसस्थानकावर बसेसच्या अवती-भवती होतांना निदर्शनास येत असून या ठिकाणी नुसतं बघ्यांची भूमिका घेण्यात येत आहे. या गंभीर बाब असून या बाबीवर कोणताही पर्यायी मार्ग काढण्यात येत नाही. अशी परिस्थिती तेल्हारा आगारची असून प्रवाशांना अतोनात यातना प्रवासादरम्यान व प्रवासासाठी भोगाव्या लागत आहेत . अशी परिस्थिती प्रवाशांवर ओढवण्यात येत असून याला जबाबदार कोण? असा संतप्त सवाल याप्रसंगी उपस्थित होत आहे .
तसेच एका बसची प्रवासी क्षमता मर्यादित असून मर्यादेपेक्षा जास्त प्रवाशांना वाहून नेण्यात येत आहे. ही अतिशय गंभीर स्वरूपाची बाब याप्रसंगी उघड झाली आहे.
शेगाव ,अकोला ,अकोट या बसस्थानकावरून तेल्हारा परत येण्यासाठी बस फेऱ्या कमी असल्यामुळे अनेक प्रवाशांना जागा मिळत नसल्यामुळे वाद- विवाद होतात तसेच अनेक प्रवाशांना तर चक्क उभ्याने प्रवास करावा लागतो आहे. त्यामध्ये जेष्ठ नागरिक ,महिला , दिव्यांग आदींचा समावेश असुन प्रवासादरम्यान अनेक प्रवाशांना कठीण यातना सहन कराव्या लागत आहेत .अनेकदा तर त्यांना स्टॉप येईपर्यंत कठीण यातनेचा प्रवास करावा लागत असल्याचेही उघड होत आहे.
बसेस मध्ये जागा मर्यादित सीटची व फेऱ्या कमी असल्यामुळे तसेच जागा मिळत नसल्याने अनेक ज्येष्ठांना , युवक प्रवाशांना आपत्कालीन मार्गाचा तसेच खिडक्यांचा व ड्रायव्हरच्या मार्गाचा उपयोग प्रवाशांना जीव धोक्यात घालवून बस मध्ये जागा मिळवण्याकरिता करावा लागत आहे. हा प्रकार
दिवसाढवळ्या कर्मचाऱ्यांसमोर घडत असून अनेकांना दृष्टी असून त्याकडे चक्क दुर्लक्ष केल्या जात आहे.
अनेक बसेस मधील सीट तुटलेल्या अवस्थेतहि आढळून येतात. अनेक प्रवाशांच्या म्हणण्यानुसार तेल्हारा आगार मध्ये खराब गाड्या वारंवार दुरुस्त करून चालवण्यात येत आहेत. अनेक वेळा तर चक्क चालू प्रवासामध्ये बसगाड्या बंद पडतात , वारंवार बसना धक्का देऊन चालू करावं लागते हा सुद्धा त्रास प्रवाशांना व वाहकांना सहन करावा लागत आहे अशी परिस्थिती तेल्हारा आगारची असून हि गंभीर स्वरूपाची बाब याप्रसंगी उघड झाली आहे.
याबाबत अनेक वेळा बस वाढवण्याकरिता प्रवाशांनी मागणी केलेली आहे परंतु बसही वाढत नाही आणि बस फेऱ्याहि वाढत नाही. तरी वरिष्ठांनी या बातमीची दखल घेऊन तेल्हारा आगार मध्ये बस व बस फेऱ्या वाढाव्यात या करिता प्रयत्न करावे अशी प्रवाशां कडून मागणी होत आहे.



