खानदेशजळगावा जिल्हामहाराष्ट्रमुक्ताईनगरसंपादकीयसामाजिक
मुक्ताईनगरात बुद्ध पौर्णिमेनिमित्त भव्य शांतता रॅलीचे आयोजन

मुक्ताईनगर प्रतिनिधी :-
बुद्ध पौर्णिमेनिमित्त मुक्ताईनगर शहरात बौद्ध समाज बांधवांकडून दिनांक 12 मे रोजी सायंकाळी 06:00 ते रात्री 10:00 वाजेपर्यंत भव्य शांतता रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. सालाबादप्रमाणे यावर्षी सुद्धा भगवान गौतम बुद्ध यांचे बौद्ध पौर्णिमेनिमित्त मुक्ताईनगर शहरातील आंबेडकर नगर येथून 12 मे रोजी रॅली काढण्यात येऊन सदरची रॅली ही आंबेडकर नगर- प्रवर्तन चौक – संताजी नगर- तहसील रोड- बोदवड रोड या मार्गाने ही भव्य शांतता रॅली निघणार आहे व प्रवर्तन चौक येथे रॅलीचा समारोप होणार आहे. तरी जास्तीत जास्त संख्येने या शांतता रॅलीत सहभागी होण्याचे आवाहन आयोजन समितीचे नाना बोदडे, अजय तायडे, अशोक बोदडे, पृथ्वीराज बोदडे यांनी केले आहे.



