महाराष्ट्र

परशुराम भगवान यांच्या पादुकांचे राहुरीत जल्लोषात स्वागत..

राहुरी प्रतिनिधी नाना जोशी ..

अहिल्या नगर ते जानापाव

( श्री भगवान परशुराम जन्मस्थान ) या परिश्रमाचे आयोजन चिरंजीव प्रतिष्ठान,अहिल्या नगर यांच्या वतीने करण्यात आले.या परिक्रमाचे स्वागत राहुरी येथे मोठ्या उत्साहात करण्यात आले.यावेळी भगवान परशुराम यांच्या प्रतिमेचे पूजन तसेच पादुकांचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.भगवान श्री परशुराम जन्मोत्सवनिमित्त ही परिक्रमा सुमारे 600 किलोमीटर अंतर पार करत श्री क्षेत्र जानपाव येथे पोहचणार आहे.यामध्ये 51 सहभागी चालक परिक्रमेत चालत प्रवास करत आहेत.हे या परिक्रमेत चे अकरावे वर्ष असून,अक्षय तृतीयेसारख्या पर्वावर भगवान परशुरांमाच्या कार्याचे स्मरण करून सामाजिक बांधिलकी जपणे, समाजजागृती करणे आणि समाज जोडणे हे या उपक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.त्यानंतर गुहा येथे सोमनाथ कुलकर्णी यांच्या निवासस्थानी भगवान परशुराम यांच्या पादुकांचे पूजन आणि मुर्ती पुजन करण्यात आले.यावेळी आरती आणि प्रसाद वितरणाचा कार्यक्रम झाला.कवी शंकर उपाध्ये यांनी रचलेल्या कवितेचे अर्थपूर्ण वाचन सोमनाथ कुलकर्णी गुरुजी यांनी केले.यावेळी उपेंद्र जोशी, राजेंद्र कुलकर्णी, हृषिकेश ब्राम्ह,सौरभ दंडवते,पियुष देशपांडे,विनय कुलकर्णी, नितीन सातभाई, सोमनाथ कुलकर्णी गुरुजी, राजेंद्र जोशी सर, उत्तर विभागीय उपसंपादक नाना जोशी, पत्रकार अनिल देशपांडे, अनंत औटी, चंद्रशेखर देशपांडे, स्वप्निल देशमुख, धनंजय पुरोहित, डॉ.निलेश खैरे, सुरेंद्र गयाळ, सुहास महाजन सर, विष्णू औटी, महावीर औटी सर, पत्रकार संजय कुलकर्णी आदींसह अनेक समाजबांधव उपस्थित होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button