खानदेशजळगावा जिल्हामहाराष्ट्रसंपादकीय

राम आणि दारूचा काय संबंध?

  भाजप ने ए टी नानांना दोन वेळा उमेदवारी दिली.ज्या नानांना मतदार मेणबत्ती लावून शोधत होते.जळगांव फर्स्ट चे लोकांनी  तर त्यांच्या शोधासाठी वर्गणी जमा केली होती.ते सापडले,एकदाचे.सर्वच निश्चिंत झाले.
भाजप ने रक्षा खडसे यांना दोन वेळा संधी दिली.आता तिसऱ्यांदा.काय विशेष?वीस लाख लोकांत रक्षा खडसे याच खासदार पदाला पात्र आहेत का?तर मग,इतरांनी महाजन, फडणवीस,बावनकुळेंचे मंडप,स्टेज बांधत आयुष्य घालवायचे का?
ए टी पाटील आणि रक्षा खडसे वर भाजपची इतकी मेहरबानी?तर मग, उन्मेष पाटील अपवाद कसे?माशी कुठे शिंकली? उन्मेष पाटील खटकले कुठे ?म्हणून हटकले.मला वाटते भाजपला बुद्धीमान, उच्चशिक्षित माणूस आमदार खासदार नको आहेत.म्हणून डावलले असावे .याच कारणे त्यांनी आमदार सुरेश भोळेंना दोन वेळा उमेदवारी दिली असावी.दारू,रेती, सट्टा माफियांना जास्त महत्त्व देण्याचे कारण काय? आत्ताच लिकर किंग शरत रेड्डी कडून पन्नास कोटी चे इलेक्ट्रॉल बॉंड घेतल्याचे उघडकीस आले आहे.ब्रम्हचारी लोकांची आरएसएस आणि ब्रम्हचारी वाजपेयी आणि मोदींची भाजप ,यांना दारूचे विशेष आकर्षण का असावे?राम आणि   दारूचा  रामायणात कुठेही सुतराम संबंध महर्षि वाल्मिक ऋषींनी सांगितलेला नाही.तरीही भाजप मधे कसा काय भिनला असावा? यांनी रामायण उलटे वाचले असेल का?"दया,कुछ तो गडबड है ? जल्दी तलाश करो."
 उन्मेष पाटील यांना शिवसेनेकडून जळगाव लोकसभेची उमेदवारी मिळाली तर प्रचाराचा नारळ आम्ही रामानंदनगर मधील मामाच्या प्रितम वाईन शॉप समोर आणि घाटावरच्या डांबरी रस्ता वर फोडणार आहोत.जेणेकरून " ही दारू आणि हा आमदार " व "हा रस्ता आणि हा आमदार" लोकांना समक्ष पाहाता येईल.
 जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळेंना महाजन आणि कंपनीने पुन्हा विधानसभा उमेदवारी दिली तर मी स्वतः विधानसभा उमेदवारी करणार आहे.माझे निवडणूक चिन्ह राहिल दारूची बाटली.आणि माझा स्टार प्रचारक राहतील दस्तुरखुद्द प्रभू श्रीरामचंद्र.जर भोळें ऐवजी मोदी ,शाह,नड्डा, फडणवीस किंवा बावनकुळेंना जळगाव विधानसभा उमेदवारी दिली तर आमचे निवडणूक चिन्ह राहिल इडी ची जेल आणि स्टार प्रचारक राहातील अरविंद केजरीवाल.बघू, कोण जिंकतो?दारू वाले कि शिकलेले?इडी वाले कि झाडूवाले?

… शिवराम पाटील
महाराष्ट्र जागृत जनमंच
जळगाव

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button