जळगाव जामोद तालुक्यातील ग्रा. पं. सरपंच पदाचे आरक्षण निश्चित होणार16 एप्रिल रोजी

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस तालुका
प्रतिनिधी हरिदास इंदोरे जळगाव जामोद
जळगाव जामोद तालुक्यातील 2025 ते 2030 दरम्यान जळगाव जामोद तालुक्यातील सार्वत्रिक निवडणुकी द्वारे गठीत होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण येत्या 16 एप्रिल ला सकाळी दहा वाजता तहसील कार्यालय जळगाव जामोद येथे निश्चित होणार आहे. ग्रामविकास व जलसंधारण विभाग मंत्रालय मुंबई यांचे कार्यालयीन अधिसूचना दि 5/3/2025 नुसार जळगाव जामोद तालुक्यातील 47 ग्रामपंचायतच्या सरपंचाची पदे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम चे कलम अन्वये तसेच मुंबई ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच निवडणूक नियम 1964 मधील तरतुदीनुसार सन 2025 ते 2030 दरम्यान जळगाव जामोद तालुक्यातील सार्वत्रिक निवडणुकी द्वारे गठीत होणाऱ्या
ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण सोडात दिनांक 16/4/2025 रोजी सकाळी ठीक दहा वाजता तहसील कार्यालय जळगाव जामोद येथे निश्चित करण्यात येणार आहे.
तसेच अनुसूचित जाती जमाती नागरिकांच्या मागास प्रवर्ग व खुल्या प्रवर्ग अंतर्गत स्त्रिया करता आरक्षण सोडत दिनांक 25/4/2025 रोजी सकाळी ठीक 11 वाजता सुरू होणार असून उपविभाग जळगाव जामोद अंतर्गत जळगाव जामोद तालुक्याचे स्त्रिया करता आरक्षण सोडत ठीक दुपारी एक वाजून 30 मी जिल्हा नियोजन समिती सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा येथे निश्चित करण्यात येणार आहे. सदर आरक्षण सोडती करिता जळगाव जामोद तालुक्यातील लोकप्रतिनिधी राजकीय पक्षाचे पदाधिकारी व नागरिकांनी जास्तीत जास्त मोठ्या संख्येने जळगाव जामोद तहसील कार्यालय येथे उपस्थित राहावे…



