जळगावा जिल्हापत्रकारमहाराष्ट्रमुक्ताईनगर

मुक्ताईनगर इलेक्ट्रॉनिक पत्रकार संघाचे अध्यक्षपदी पंकज कपले उपाध्यक्षपदी अक्षय काठोके तर सचिव पदी विठ्ठल धनगर यांची एक मताने निवड

मुक्ताईनगर

*

मुक्ताईनगर प्रतिनिधी – मुक्ताईनगर शहरातील शासकीय विश्रामगृहामध्ये आज मुक्ताईनगर तालुक्यातील इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रतिनिधींची बैठक पार पडली , या बैठकीमध्ये मुक्ताईनगर इलेक्ट्रॉनिक पत्रकार संघाची स्थापना करण्यात आली, यावेळी एकमताने या पत्रकार संघाचे अध्यक्ष म्हणून लाईव्ह ट्रेड न्यूज चे पंकज कपले यांची तर मंडे टू मंडे न्यूज चे अक्षय काठोके यांची उपाध्यक्षपदी व उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कचे जिल्हा प्रतिनिधी विठ्ठल धनगर यांची सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली.

मुक्ताईनगर शहर आणि तालुक्याला खूप मोठा राजकीय धार्मिक आणि शैक्षणिक वारसा लाभलेला आहे, या अनुषंगाने इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे वृत्तांकन करणाऱ्या प्रतिनिधींची संख्या ही फार मोठ्या प्रमाणात आहे, त्यांचा आवाज शासनापर्यंत पोहोचावा यासाठी आज इलेक्ट्रॉनिक पत्रकार संघाची स्थापना करण्यात आली, यावेळी तालुक्यातील इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रतिनिधी उपस्थित होते ,या झालेल्या बैठकीमध्ये पंकज कपले यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली, उपाध्यक्ष म्हणून अक्षय काठोके यांची नियुक्ती करण्यात आली, सचिव म्हणून विठ्ठल धनगर यांचे नियुक्ती करण्यात आले, तर खजिनदार सचिन झनके यांची नियुक्ती करण्यात आली, या पत्रकार संघाच्या सल्लागारपदी प्रमोद सौंदळे व दत्तात्रय गुरव यांची नियुक्ती करण्यात आली. झालेल्या या बैठकीसाठी अतिक खान, कैलास कोळी,पंकज तायडे, रवी गोरे,देव गायकवाड,दीपक माळी,सुमित बोदडे आदी पत्रकार बांधव उपस्थित होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button