खगोल क्षेत्रातली अनोखी घटना ! , स्वातंत्र्यदिनी गुरु आणि मंगळ ग्रह भेट.

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस विजय घोडे प्रतिनिधी
अकोला दि. १२ ऑगष्ट : आकाशात चंद्र आणि ग्रह यांच्या युतीचा नजारा आपण अधून-मधून बघतो परंतु एकसाथ दोन ग्रह मात्र क्वचितच पाहायला मिळतात. स्वातंत्र्यदिनी पूर्व क्षितिजावर आकाशातील सर्वात मोठा असलेला गुरु आणि लालसर रंगाचा मंगळ ग्रह या दोन ग्रहांची युती घडून येत आहे.
बऱ्याच दिवसांपासून आकाशात दिसणारी ढगांची गर्दी कमी होत असल्याने हा अपूर्व आकाश नजारा रात्री दोन नंतर पहाटे पर्यंत बघुन या अनोख्या खगोलीय घटनेचे साक्षीदार होण्याचे आवाहन विश्वभारती केंद्राचे प्रमुख प्रभाकर दोड यांनी केले आहे.
आकाशातील वृषभ राशीत घडून येणारी या दोन महान ग्रहांची भेट पूर्वेच्या जरा उत्तर बाजूस रोहिणी ताऱ्याजवळ आणि सहा तारकांचा पूंजका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कृत्तिका (ग्रामीण भागात याला आकाशातील लहान विंचू ) नक्षत्राच्या खाली छानपैकी बघता येईल.
या दोन्ही ग्रहांचे उदय रात्री १:११ ला होत असुन त्यांचा अस्त दूपारी २:२९ ला
पश्चिमेस होईल .याचवेळी रोहिणी जवळच जरा वरच्या बाजूला दोन तारकांची जोडी एकमेकांजवळ पाहता येईल. यावेळी पृथ्वी, मंगळ आणि गुरु ग्रह एका रेषेत असतील. या अनोख्या खगोलीय घटनेचा आनंद आकाश प्रेमिंनी घ्यावा व आपले आकाश प्रेम वाढीस लावावे




