महाराष्ट्र

मुख्याध्यापक खेस माळसकर यांचे शैक्षणिक कार्य कौतुकास्पद सचिव रविराज गडाख. सोनई/ शनिशिंगणापूर

मुख्याध्यापक खेस माळसकर यांचे शैक्षणिक कार्य कौतुकास्पद सचिव रविराज गडाख. सोनई/ शनिशिंगणापूर—आदर्श विद्यालयाचे मुख्याध्यापक भाऊसाहेब खेसमाळसकर यांनी ३२ वर्ष केलेली सेवा करून ५८ वर्षी नुकतेच निवृत्त झाले ,त्यांचा सेवापूर्ती निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे गौरव उद्गार असल्याचे मत आदर्श विद्या मंदिर संस्थापक सचिव रविराज पाटील गडाख यांनी काढले. आदर्श विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. भाऊसाहेब खेसमाळसकर, वरिष्ठ लिपिक उद्धव दारकुंडे , सहशिक्षक दिलिप वाबळे व पोपट खरचंद हे नियतवयोमानानुसार सेवानिवृत्त झाले, तेव्हा त्यांचा आयोजित करण्यात आलेल्या सेवापूर्ती सन्मान सोहळ्यात हनुमान ग्रामीण विकास व संशोधन मंडळच्य (पानसवाडी) अध्यक्षा सौ. जयश्रीताई रवीराज गडाख व संस्थाचे सचिव श्री रवीराज तुकाराम पा.गडाख यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी रविराज गडाख बोलत होते. अध्यक्षा जयश्री ताई गडाख म्हणाल्या,हा सोहळा अश्रूचा मेळा न बनता एक अविस्मरणीय आठवणीचा सोहळा असून केवळ नोकरी न समजता सेवा ,ध्येय ,समजून एक आपुलकीची सेवा म्हणून या शिक्षकांनी जबाबदारी पार पाडली ,असल्याचे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष जयश्रीताई गडाख यांनी केले. शनिश्वर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका इंदुमती खंडागळे यांनी शिस्तप्र्रेतेचा आणि सेवा भावाचा उल्लेख करून उत्कृष्ट मार्गदर्शक म्हणत योगदान उलगडले. चौकट एकाच ठिकाणी, एकाच पदावर, पंचवीस वर्ष शैक्षणिक अशा पवित्र शाळेत मला सेवा करण्याची संधी संस्थेच्या मंडळांनी दिली आणि मी ती पार पाडली , खेसमाळस्कर यांनी संस्थेचे मनापासून भावनिक होऊन आभार मानले.* या प्रसंगी ,शिक्षक सोसायटी चे नवनिर्वाचित सदस्य श्री अप्पासाहेब शिंदे, सुनील दानवे यांचा ही सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शीवाशेठ बाफना, अरुण चांदघोडे, आदर्शाचे मुख्याध्यापक अनिल कलापुरे शेंडे सर, अनिल दरंदले, कर्जुले सर, डमाले सर, नेवासा, शेवगाव, सोनईचे माध्यमिक/ प्राथमिकचे मुख्याध्यापक सह ,शनेश्वर विद्यालयाचे प्राचार्य मा.इंदूमती खंडागळे , हसनापूर विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.श्री.उगलमुगले, पर्यवेक्षक,मा.शिवाजी कर्जुले, शनिशिंगणापूर विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.दिलीप लोडे , मोरे चिंचोरे चे श्री.मुगसे, शनिशिंगणापूर देवस्थानचे विश्वस्त व मुळा कारखाना विद्यालयाचे पर्यवेक्षक आप्पासाहेब शेटे , गणेशवाडी हायस्कूलचे मुख्याध्यापक मा.लोहकरे , शिगनापूर विद्यालयाचे जायगुडे इतर मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन शिक्षक अशोक दराडे तर आभार श्रीमती रासने मॅडम यांनी केले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button