महाराष्ट्रमुबई

राष्ट्रीय अ‍ॅथलेटिक स्पर्धेत नारायण मयेकरची बहुमोल कामगिरी – १ सुवर्ण, २ रौप्य आणि १ सांघिक पदकावर मोहोर

ओरीसा : येथे झालेल्या राष्ट्रीय अ‍ॅथलेटिक स्पर्धेत नारायण मयेकरने अप्रतिम कामगिरी करत एक सुवर्ण, दोन रौप्य आणि एक सांघिक पदक पटकावत आपली चमक सिद्ध केली. विविध क्रीडा प्रकारांमध्ये आपल्या कौशल्याचा प्रत्यय देत त्याने राष्ट्रीय पातळीवर आपल्या नावाचा ठसा उमटवला. नारायणने 5000 मीटर चालणे शर्यतीत विजयी घोडदौड करत सुवर्णपदक पटकावले. तसेच, 110 मीटर अडथळा आणि ४०० मीटर अडथळा धावणे शर्यतीत उत्कृष्ट प्रदर्शन करत त्याने रौप्यपदकावर कब्जा केला. त्याशिवाय ४x१०० मीटर रिले धावणे स्पर्धेत संघासोबत दमदार कामगिरी करत सांघिक पदक मिळवले.

या कामगिरीमुळे नारायणवर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्याच्या यशाने कुटुंब, मित्रपरिवार, प्रशिक्षक आणि संघाचा अभिमान उंचावला आहे. नारायणच्या यशाबद्दल वसई विरार स्थानिक प्रशासन आणि क्रीडा संघटनांकडून त्याचा सत्कार करण्यात येणार आहे. महाराष्ट्र संघाने मास्टर्स गेम च्या वैयक्तिक आणि सांघिक स्पर्धेत उत्तम कामगिरी केली आहे. मास्टर गेम असोसिएशन महाराष्ट्र (रजिस्टर) संस्थेचे श्री बाळू चव्हाण (सचिव), श्री हेमंत कोणे, (पालघर जिल्हा – सचिव) आणि सहकारी यांच्या उत्तम मार्गदर्शनामुळे ओरीसा येथील राष्ट्रीय अ‍ॅथलेटिक स्पर्धेत महाराष्ट्र संघाला अनेक पदक जिंकता आले.

नारायण मयेकरची यास पुढील श्रीलंका येथील आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी सर्वस्तरावरून शुभेच्छा दिल्या जात असून, त्याची ही कामगिरी भविष्यातील खेळाडूंना प्रेरणा देणारी ठरली आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button