चेंबर आउटलेट जोळणी वर्क ऑर्डर आठ दिवसात द्या अन्यथा 2. फेब्रुवारी रोजी आक्रमक आंदोलन

15 नवीन चेंबर बांधण्याची ही मागणी.सुमारे पाच वर्षा अगोदर मातंगपुरी चे पुनर्वसन झाले असून.पुनर्वसीत ठिकाणी आरोग्या च्या दृष्टीकोनातून कोणतेच काम करण्यात आले नाही.नगर परिषदेच्या नकर्ते पणा मुळे नगरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. डॉ. अण्णा भाऊ साठे नगर म्हाडा कॉलनी येथील राहिवाशांना दिलेल्या सदनिकेला स्वातंत्र्य टॉयलेट चेंबर नाही.कॉलनीत सर्व सदनिकेचे एकच मोठे टॉयलेट चेंबर आहे .त्या चेंबर मध्ये घाण वाहून नेण्या करीता 28 चेंबर तयार करण्यात आले आहेत. आणि हे चेंबर साफ न केल्या मुळे वारंवार तुडुंब भरत असल्याने घाण बेहेरे येऊन नागरिकांण्याच्या आरोग्यास धोका उद्भवला आहे. 28 चेंबर साफ करणे व चेंबर आउटलेट जोळने अत्यावश्यक असल्याने माघील दोन तीन वर्षा पासून गोपाल तायडे यांच्या कडून या संदर्भात सातत्याने पाठपुरावा करीत असल्याने. म्हाडा कॉलनीतील चेंबर आउटलेट मध्ये जोळणी करण्याचे टेंडर देण्याकरिता नगर परिषदेला भाग पडलेले होते. परंतु टेंडर देण्याची प्रक्रिया पूर्ण होऊन देखील मुख्यअधिकाऱ्यांन कडून वर्क ऑर्डर दिल्या जात नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शहर अध्यक्ष गोपाल तायडे यांनी मुख्यअधिकाऱ्यांशी भेट घेऊन येत्या आठ दिवसात टॉयलेट चेंबर आउटलेट जुळण्या संदर्भातील वर्क ऑर्डर तसेच पंधरा नवीन चेंबर बधण्याचे आदेश न दिल्यास कोणत्या क्षणी आक्रमक आंदोलन करू असा ईशारा देण्यात आला आहे.



