बुलढाणामहाराष्ट्र

तलाठ्याच्या कुत्र्याने महिलेच्या पायाचा तोडला लचका !

कुत्र्याच्या प्राणघातक चाव्यात दोन बकऱ्यांचा गेला बळी !

प्रशासनाचे सपशेल दुर्लक्ष!

तलाठी कार्यालयातील पाळीव कुत्र्यांचा आतापर्यंत अनेकांना चावा !

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस विजय म घोडे प्रतिनिधी अकोला

हिवरखेड :- अकोला जिल्ह्यातील हिवरखेड येथील एका कुत्र्याच्या गंभीर हल्ल्यात एक महिला जखमी झाली असून या महिलेनी सरळ पोलीस स्टेशन हिवरखेड येथे जाऊन तक्रार दाखल केली आहे.

सविस्तर प्रकरण असे की, महिला तलाठी विद्या मावळे यांच्या पाळीव कुत्र्यांनी आतापर्यंत अनेक जणांना चावा घेतल्याने अनेक नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला असून तलाठी महिलेच्या पाळीवकुत्र्यांना लगाम लावण्याच्या बाबतीत प्रशासनाचे सपशेल दुर्लक्ष होत असल्याचे लक्षात येते.

हिवरखेड येथील महिला तलाठी विद्या मावळे यांच्या घरीच तलाठी कार्यालय कार्यरत आहे. त्यामुळे दररोज अनेक शेतकरी व नागरिकांचे तेथे ये- जा सुरू असते. बस स्टँड समोरील पूर्वा कॉलनी येथे अनेक सुशिक्षित नागरिकांची वस्ती असून त्या मार्गाने अनेक शेतकऱ्यांची व शेतमजुरांची वर्दळ असते. परंतु महिला तलाठी विद्या मावळे यांना कुत्रे पाळण्याची आवड असून मागील अनेक वर्षांपासून त्यांनी विविध कुत्रे पाळलेले आहेत. कायद्याने त्यांना कुत्रे पाळण्याचा अधिकार असला तरी त्यातील विविध कुत्र्यांनी आतापर्यंत अनेक नागरिकांना आणि इतर जनावरांना सुद्धा चावा घेऊन जखमी केले आहे. त्या कुत्र्यांमुळे इतर नागरिकांच्या आणि प्राण्यांच्या जीवाला धोका निर्माण होत असल्याने गावातील नागरिक प्रचंड धास्तीत आहेत. आतापर्यंत दोन नागरिकांच्या बकऱ्यांवर कुत्र्यांनी हल्ला करून गंभीर चावा घेतला व त्या कुत्र्यांच्या हल्यात दोन बकऱ्यांचा प्राण गेला. त्यांच्या कुत्र्यांच्या तोंडाला रक्त लागल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. तलाठीच्या घरात आणि कार्यालयात चोविस तास अनेक कुत्र्यांचा वावर असल्याने शेतीच्या आणि महत्त्वाच्या कामासाठी तलाठी कार्यालयात येण्यास शेतकरी यांच्यात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यापूर्वीसुद्धा अनेक जणांना त्यांच्या कुत्र्यांनी चावा घेतल्या बाबत बराच वादंग झालेला आहे. अनेक प्रकरणे पोलीस स्टेशनमध्ये गेलेली आहेत. जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत तक्रारी केल्या आहेत. तरीसुद्धा सदर तलाठ्याच्या पाळीव कुत्र्यांवर लगाम लावण्यात प्रशासनाला सपशेल अपयश आले असल्याचे समजते.
दिनांक सहा मार्च रोजी तलाठ्या महिलेचे शेजारी रहिवासी सौ. मीनाबाई गजानन बेलूरकर वय 58 ह्या घरकाम करीत असताना तलाठी महिलेच्या पाळीव कुत्र्याने मिनाबाई यांच्या पायाचा लचका तोडून जबर चावा घेतला. ज्यामध्ये मिनाबाईच्या पायाला गंभीर दुखापत झाली. कुटुंबीयांनी त्यांना तात्काळ हिवरखेड प्राथमिक आरोग्यकेंद्रात नेले असता पायाची गंभीर जखम बघता त्यांना पुढील उपचारार्थ अकोला सामान्य रुग्णालयात रेफर करावे लागले.
सदर कुत्र्याच्या हमल्याने धास्तीत असलेल्या मिनाबाई यांनी रात्री पोलीस स्टेशन गाठत आपली कैफियत पोलिसांसमोर मांडली. मिनाबाईंनी दिलेल्या फिर्यादीवरून हिवरखेड पोलिसांनी आरोपी विद्या मावळे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 291 नुसार गुन्ह्याची नोंद केली आहे.

मनोज बेलूरकर हा जखमी महिलेचा मुलगा असून यांच्या कडून प्राप्त माहितीनुसार या कुत्र्याने त्यांच्या आईवर हल्ला चढवून गंभीर चावा घेतला. या आधी सुद्धा तलाठ्याच्या कुत्र्याने चावा घेऊन अनेकांवर हमला केला आहे. अनेक तक्रारी करून सुद्धा शासन ,प्रशासन हे तलाठी व त्यांच्या कुत्र्यांना पाठीशी घालत आहे. नागरिकांच्या जीवावर उठलेल्या या पाळीव कुत्र्यांचा ताबडतोब बंदोबस्त करून दोषी महिलेवर कठोर कारवाई करावी यासाठी नगरपरिषद प्रशासक, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, यासह विविध ठिकाणी लेखी तक्रारी केल्या आहेत.

हिवरखेड येथील महिला असलेल्या तलाठी विद्या मावळे यांच्या प्रतिक्रियेनुसार त्यांचे म्हणणे आहे की, सदर कुत्र्यांना मी पाळलेले नसून
माझे प्राणी मात्रांवर असलेल्या प्रेमापोटी मी त्यांना खायला देते. चावणाऱ्या कुत्र्याला आधी सुद्धा बाहेर सोडून दिले होते. परंतु ते परत आले. आता पुन्हा बाहेर नेऊन सोडणार आहे.

ही घटना अतिशय गंभीर असून यामुळे मानवी तसेच प्राणीमात्रांच्या जीवितास धोका निर्माण झाला असल्याचे दिसून येते तरी प्रशासनाने या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन नागरिकांना होणाऱ्या त्रासापासून मुक्त करण्यात यावे अशी मागणी जोर धरत आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button