Uncategorized
लांजुड येथील घरकुल लाभार्थ्यांना जागेवर घरकुल बांधकाम करण्याबाबतचे खामगाव S.D.O यांना निवेदन…

.
खामगाव . प्रतिनिधी रोकडे
लांजुळ येथील भाग क्रमांक 1 मधील 49 नागरिकांचे घरकुल मंजूर झाले आहे परंतु सदरचे नागरिक हे 50 वर्षापेक्षा जास्त दिवस सदरच्या जागेवर रहिवासी आहेत. त्यांना ग्रामपंचायतच्या विविध सुविधा म्हणजे नळ कनेक्शन रहिवासी दिवाबत्ती ,आरोग्य कर पाणी कर ,हे सुद्धा नियमित भरत आहे. सदरची जागा सातबारा धारक व्यक्ती कडून नागरिकांना सदरच्या जागेवर घर बांधण्यासाठी मनाई करीत आहे. अशा प्रकारचे निवेदन घरकुल लाभार्थ्याकडून तसेच शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्रबघे व इतर पदाधिकाऱ्यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी रामेश्वर पुरी
साहेबांना देण्यात आले. यावेळी सर्व घरकुल लाभार्थी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते…



