महाराष्ट्र

“रिठद येथे शेकडो वर्षाच्या परंपरेनुसार भगवान मुर्डेश्वर यांची दिंडी व सप्ताह प्रारंभ”

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड

वाशिम : – वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील वर्षानुवर्ष चालत आलेल्या परंपरेची दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भगवान मुर्डेश्वर यांच्या चांदीच्या मूर्तीची नागपंचमीच्या दिवशी संपूर्ण गावाला प्रदक्षिणा घालून संत सभागृहात भगवान मुर्डेश्वर यांच्या चांदीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येते. सतत सप्ताहभर दररोज सकाळी काकड आरती, हरिनामाची सुरुवात होते. तर सायंकाळी कीर्तन होतात. यादरम्यान सर्व घराण्याच्या पंगती दररोज होतात. ही परंपरा हजारो वर्षाच्या पूर्वीची असल्याची वयोवृद्ध सांगतात. रिठद येथील मुर्डेश्वर मंदिरातील लिंग रामायण काळातील महादेवाचे लिंग असून याचा उल्लेख रामायणात सापडतो. त्या काळात प्रभू राम हे सीतेला पहात- पहात रिठद येथे आले व येथून परत मुरडले त्यामुळे या ठिकाणाला मुर्डेश्वर असे नाव रिठद या गावचे त्या काळातील नाव सिद्धपूर असे होते.या सप्ताह दरम्यान निघणाऱ्या दिंडीत गावातील आबाल वृद्ध, तरुण, महिला व सर्व भजनी मंडळी उपस्थित होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button