महाराष्ट्रविदर्भसामाजिकसांस्कृतिक

तेल्हारा शहरात दख्खनी मराठा समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची 395 वी जयंती उत्साहात साजरी!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस विजय घोडे प्रतिनिधी

तेल्हारा. दि.19 फेब्रु. 2025 l तेल्हारा शहरात बुधवार दिनांक 19 फेब्रुवारी 2025 रोजी हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची 395 वि जयंती विविध कार्यक्रम राबवून उत्साहात साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज शहाजीराजे भोसले यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून दिनांक 19 फेब्रुवारी रोजी तेल्हारा शहरात दख्खनी मराठा समाजाच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

   ''रक्त सांडून जीवन संपवण्यापेक्षा , रक्त दान करून जीवदान द्या'' या सुविचाराला प्रेरित होऊन आयोजित  कार्यक्रमातील रक्तदान शिबिरात अनेक दखनी मराठा समाजातील नागरिकांनी रक्तदान करून आपला सहभाग नोंदविला ही अतिशय कौतुकास्पद बाब आहे.  या कार्यक्रमांमध्ये रांगोळी स्पर्धा , वकृत्व स्पर्धा, वेशभूषा स्पर्धा अशा स्वरूपाच्या अनेक स्पर्धा राबवून  विजेता स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण केले.  या कार्यक्रमाचे आयोजन माहेश्वरी भवन तेल्हारा येथे करण्यात आले होते . सायंकाळी 05:00 वाजता शहरातून छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा स्थापित पालखी यात्रा काढण्यात आली असून या पालखीयात्रे मध्ये अनेक दख्खनी मराठा समाजातील बंधू- भगिनी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. तसेच पालखी यात्रेमध्ये सहभागी झालेल्या आकर्षक लेझीम पथकाने तर सर्वांचे चक्क लक्ष वेधून घेतले होते . मोहिनीताई नंदकिशोर गोरडे यांनी मंचावरील कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान भूषविले असून कार्यक्रमात प्रस्तावना अनंता गुरुजी यांनी  तर उत्कृष्ट सूत्रसंचालन मेघा विजय इंगळे यांनी केले तर आभार प्रदर्शन गजानन नारायणराव पवार यांनी केले. कार्यक्रमाची सांगता उत्कृष्ट शिव- भोजनाने करण्यात आली.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button