बुलढाणामहाराष्ट्र

मुख्यध्यापिका यांना लाज घेताना रंगेहात पकडले

मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहातील घटना

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

श्याम पहूरकर

शेगाव । येचील मागासवर्गीय मुलीच्या शासकीय वसतिगृहाच्या प्रभारी मुख्याध्यापिका श्रीमती सीमा वनकर यांना लाच घेतांना बुलढाणा लाचलुचपत विभागाच्या अधिकान्यांनी रंगेहाथ पकडले असून विविध कलमान्वये त्यांचेविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वसतिगृहात पुरविल्या जाणाऱ्या भोजनव्यवस्थेची विद्यार्थीनीची दरमहा उपस्थिती व भोजन पुरविण्याबाबत कोणतीही तक्रार समाज कल्याण

बुलढाणा लाचलुचपत प्रतिबंधक प्रतिबंधक विभागाची विभागाची कारवाई कारवा

आजच्या घटनेत कारवाई करणाऱ्या अधिकारी ह्या महिला आहेत, तसेच तक्रारदार ह्यासुध्दा महिला आहेत आणि ज्यांच्यावर कारवाई झाली त्या मुख्याध्यापिका सुध्दा महिला आहेत

मुख्याध्यापिका अडकल्या.. विभागाच्या अधिकाऱ्यांकडे

न करण्यासाठी प्रभारी मुख्याध्यापिका यांनी भोजनव्यवस्थेच्या कंत्राटदाराकडे २ लाख १० हजार रूपये इतक्या लाचेची मागणी केल्याची तक्रार बुलढाणा लाचलुचपत विभागाला प्राप्त झाली होती.

त्यावरून आज ११ फेब्रुटारी रोजी लाचमागणी पंचासमक्ष पडताळणी कार्यवाही आयोजित केली असता लोकसेविका श्रीमती बनकर तक्रारदार यांना भोजन बिलाचे प्रतीमाह ३०,००० रूपयेप्रमाणे ५ महिन्याचे एकुण १,५०,००० रूपये व दुध पुरवठा बिलाचे प्रतीमाह ५,००० रूपयेप्रमाणे १२ महिन्याचे ६०,००० रूपये असे एकुण २,१०,००० रूपयांची लाचेची मागणी करुन भोजन बिलाच्या लाचेचा पहीला हप्ता म्हणून दोन ६०,००० रुपये आज ११ फेब्रुवारी रोजी तसेच उर्वरीत लाच रक्कम बिले प्राप्त झाल्यानंतर स्विकारण्यास संमती दर्शविली. त्यावरुन आज ११ फेब्रुवारी रोजी आयोजीत सापळा कारवाई दरम्यान लोकसेवक श्रीमती सिमा प्रभाकर वनकर, पद सहा. शिक्षीका, अति. पदभार मुख्याध्यापक वय ५४ वर्ष, अनुसुचीत जाती मुलींची शासकीय निवासी शाळा शेगाव जि. बुलढाणा यांनी तक्रारदार यांच्याकडुन पंचासमक्ष भोजन बिलाच्या २ महिन्याचा पहीला हप्ता ६०,००० रुपये स्विकारून लोकसेवक या नात्याने गैरमागनि कर्तव्य पार पाडल्याचा मोबदल्याच्या स्वरुपात स्वतःचा आर्थिक गैरलाभकरून घेतला त्यावरून लोकसेविका यांना ताब्यात घेवुन त्यांचेविरुध्द पोलीस स्टेशन शेगाव शहर येथे कलम ७ भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रकीया चालु आहे

सदर कारवाई सापळा अधिकारी श्रीमती शितल घोगरे, पोलीस उपअधिक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो, बुलढाणा, सापळा पथक पोलीस निरीक्षक रमेश पवार, पोहेकॉ. प्रविण बैरागी, राजेंद्र क्षिरसागर, पोना /विनोद लोखंडे, जगदीश पवार, पोकों रंजित व्यवहारे, मपोकॉ. स्वाती वाणी, चानापोकों/नितीन शेटे, अरशद शेख, अॅन्टी करप्शन ब्युरो, बुलढाणा यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनात पार पाडली.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button