महाराष्ट्रविदर्भ
‘श्रीं’चे दर्शन. घेतली राज्यमंत्र्यांन

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
श्याम पहूरकर
शेगावः राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी मंगळवारी दिव्यांग बांधव आणि अनाथ बालकांसोबत श्री संत गजानन महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले.
राज्यमंत्री डॉ. भोयर दौऱ्यावर असताना वर्धा जिल्ह्यातून आलेल्या सुमारे १५० दिव्यांग आणि अनाथ बालकांसोबत शेगाव येथे पोहोचले. त्यांनी संस्थानचा आढावा घेतला, तसेच संत गजानन महाराज संस्थानच्या व्यवस्थापनाबाबत
माहिती जाणून घेत महाप्रसादही घेतला. श्री संस्थानच्या वतीने डॉ. भोयर यांचा सपत्नीक सन्मान करण्यात आला.
यावेळी जिल्हा उपनिबंधक नानासाहेब देशमुख, सहायक कार्यक्रम अधिकारी मंगेश भोरसे, गटशिक्षणाधिकारी श्रद्धा वायदंडे उपस्थित होत्या



