बी.एस.एन.एल. कार्यालयात 76 वा गणतंत्र दिवस उत्साहात साजरा!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस विजय घोडे प्रतिनिधी
अकोट दि.26 जानेवारी 2025 | काल संपूर्ण राष्ट्रात 76 वा गणतंत्र दिवस साजरा करण्यात आला असून अकोट येथील भारत संचार निगम लिमिटेड (BSNL), दुर्भाष केंद्र येथे हा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा करण्यात आला. याप्रसंगी अकोट विभागाचे उपमंडल अभियंता श्री गोपाल डांगे यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहण सकाळी 8 वाजता करून राष्ट्रीय ध्वजाला सलामी देत राष्ट्रगीत गायन व महामानवांच्या प्रतिमेला वंदन करण्यात आले. ”भारत माता की जय, प्रजासत्ताक दिन चिरायू होवो’, वंदे मातरम” तसेच महापुरुषांचा जयघोष याप्रसंगी उपस्थितांकडून करण्यात आला . परिसरात सुंदर रांगोळी काढल्याने कार्यक्रमाला दिव्यता आली. ध्वजारोहण कार्यक्रमानंतर बीएसएनएल कार्यालयाकडून उपस्थित मान्यवर, कर्मचाऱ्यांना अल्पोपहार ,चहा ,पेढे वाटप करून हा उत्सव मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाकरिता बी एस एन एल चे जी.टी.ओ. कुणाल तेलगोटे , राजेंद्र दोहरे, ढोले , गजानन मोहोळ, नुसरत अली, रियाज खान, लोणकर , सोळंके, फरकाळे , जयंत वानखडे , सचिन सोनोने, हिम्मतराव सोनवणे , विजय तराळे , गजानन घुगे , गणेश घुगे , व स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेसचे या वृत्त संस्थेचे पत्रकार बंधू विजय घोडे यांचे सह आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.




