गुन्हेगारी
ऑटो मधील महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोथ लंपास

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
श्याम पहूरकर
शेगाव : ऑटोने जाणाऱ्या
महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोथ दोन दुचाकीवरुन आलेल्या चोरट्यांनी लंपास केल्याची घटना मुरारका शाळेजवळ घडली. सौ. माधुरी महेश गणगणे (३०) रा. जुने महादेव मंदिर खिडकीवेस या व त्यांची दिरानी या दोघी हळदी कुंकवाच्या कार्यक्रमावरुन ऑटोने घरी जात होत्या. यावेळी मागून दुचाकीने आलेल्या दोघांनी सौ. माधुरी यांच्या गळ्यातील १९ ग्रॅमची सोन्याची पोथ (किं. ४८ हजार) हिसकावून घेत पोबारा केला. यावेळी नागरिकांनी त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला पण ते मिळून आले नाहीत.
याबाबत सौ. माधुरी गणगणे यांनी शहर पोलिस स्टेशनला तक्रार दिली असून यावरुन पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे



