तेल्हारा शहरात राष्ट्रमाता मा साहेब जिजाऊ यांची 427 वी जयंती उत्साहात साजरी

दि.12 जानेवारी 2025 | स्थानिक तेल्हारा शहरातील जय भवानी चौक येथे दखणी मराठा समाज मंडळातर्फे राजमाता ,राष्ट्रमाता ,मा साहेब जिजाऊ यांची 427 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून तेल्हारा शहरातील दखणी मराठा समाज मंडळाचे अध्यक्ष कुष्णाभाऊ पवार यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजनाने कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आले. याप्रसंगी राजमाता जिजाऊ मासाहेब यांना अभिवादन करण्याकरिता सुनिल भाऊ पवार ,सुधाकर मुंडेकर, उमेश भाऊ शिंदे, नारायणराव शेळके , अशोकराव वाळके ,अनंत सोनमाळे, दिनेश शेळके, चंद्रकांतभाऊ मोरे ,सचिन गरजे ,संजय इंगळे , अजिंक्य शेळके , ईश्र्वरी शेळके , प्राची शेळके आधी समाजातील जेष्ठ तसेच युवा वर्ग कार्यक्रमाला मोठ्या संख्येने आवर्जून उपस्थित होता . कार्यक्रमांमध्ये सूत्रसंचालन अनंत सोनमाळे यांनी आभार प्रदर्शन केले.



