Uncategorized

लोकेशन मलकापूर जिल्हा बुलढाणा

श्रीराम वान गमन पद यात्रा अयोध्या ते रामेश्वरम, शैलेंद्रसिंग महाराजांचे मलकापूर शहरात आगमन
श्रीराम मंदिर अयोध्या धाम येथे रामलाल विराजमान झाल्या नंतर राम राज्य स्थापनेची कामान
मलकापूर –
भगवान श्रीरामचंद्र यांनी तेत्रा युग मध्ये भगवान शिव यांची नगरी काशी ज्याला वेद, धर्मग्रंथ, पुराण सह भगवान शंकराच्या त्रिशूळावर वसलेले शहर म्हणून स्वीकारले आहे, जे रामेश्वर, काशी पंचक्रोशीच्या तिसऱ्या स्टॉप साइटवर आहे. एके काळी, करोंडा वनस्पतीच्या विपुलतेमुळे, ते “करुणा” गाव म्हणून ओळखले जात असे, परंतु भगवान श्री राम भगवान श्री रामाने पंचक्रोशी यात्रेत आल्यानंतर, वाळूने मूठभर वाळूची “शिवाची मूर्ती” स्थापित केली गेली आणि परमेश्वराची स्थापना झाली. वाळूतून “शिव” आणि “राम”. सुरुवातीची भेट ही झाली, या शहरात स्थापन झालेल्या शिवलिंगच्या स्थापनेसाठी ते आता रामेश्वर महादेव (रामेश्वर तीर्थ धाम) म्हणून ओळखले जाते. अयोध्या धाम मध्ये मागील वर्षी प्रभू श्री रामलल्ला विराजमान झाले आहे आणि आता त्या अनुषंगाने रामराज्य भारत वर्षात स्थापित व्हावे या समरसता भाव निर्माण व्हावे या दृष्टिकोनातून प्रभू श्री राम यांनी जो प्रवास करून रामेश्वर येथे पोहोचले त्या मार्गाने प्रवास करावा या करिता
शैलेंद्र सिंग 27 नोव्हेंबर 2024 रोजी अयोध्या येथुन निघाले . शैलेंद्र सिंह यांचे जन्मस्थान मोतीगंज गोंडा उत्तर प्रदेश अयोध्या धाम पासून उत्तरेस 40 किमी अंतरावर आहे, ते एम.ए, बी. ऍड, एम.एस डब्ल्यू उच्च शिक्षित आहे. त्यांचे वय 39 वर्षे आहे, ते पूर्वी बजरंग दल हे जिल्हा संयोजक ही राहिले आहे.
सदर प्रवास 27 नोव्हेंबर 2024 रोजी गुरुस्थान श्री रामवल्लभा कुंज जानकी घाट अयोध्याजी पासून सुरू होऊन 75 दिवस ,2335 किमी पायी प्रवास करून 15 फेब्रुवारी रोजी रामेश्वरम येथे संपेल.
सामाजिक समरसता भावनेने सीता राम या नामाचा जप करत वाटे मध्ये भेटत असलेल्या लोकांना भगवान श्रीरामाच्या जीवनातून प्रेरणा घेऊन काम करण्याची गरज आहे व या करिता आपण सर्वांना संघटित होण्याची गरज आहे असा सन्देश देत आहे. याआधीही शैलेंद्र सिंहजीं यांनी अयोध्या ते मथुरा पदयात्रा केली होती, यामध्ये भारताचे प्रधान सेवक नरेंद्र मोदीजी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्य नाथजी यांनी शैलेंद्र सिंहजी यांची भेट घेतली होती.
शैलेंद्र सिंहजी 31 डिसेंबर रोजी बुलढाना जिल्हा मध्ये प्रवेश केले ते खामगाव येथे मुकाम करून, 1 जानेवारी रोजी दुपारी नांदुरा तर मलकापूर शहरात रात्री आगमन झाले, या प्रसंगी विश्व हिंदू परिषद बजरंगदल खामगाव, नांदुरा,मलकापूर व्दारे त्यांचें पुजन, माल्या अर्पण करून स्वागत करण्यात आले आणि पुढील प्रवासा करिता शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी विश्व हिंदू परिषद खामगाव जिल्हा सहमंत्री सुयोग शर्मा, जिल्हा समरसता सहप्रमुख दीपक चवरे, जिल्हा मंदिर अर्चक पुरोहित प्रमुख बंसिदास बैरागी,प्रखंड मंत्री दिलीप पाटील, बजरंग दल मलकापूर नगर संयोजक दीपक कोलते,बजरंग दल नगर सहसंयोजन दत्तात्रय तायडे उपस्थितीत होते

सुदर्शन न्युज मराठी प्रतिनिधी अनिल कुमार गोठी
मलकापूर जिल्हा बुलढाणा

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button