सावित्रीबाईंनी समाजासाठी सर्वस्वच नव्हे तर प्राणार्पणही केले

भिमराव परघरमोल
तेल्हारा तालुका प्रतिनिधी (दि. ४ एप्रिल 2025)
सावित्रीबाई फुलेंनी समाजासाठी सर्वस्वच नव्हे तर स्वतःचे प्राणही अर्पण केले असे प्रतिपादन भिमराव परघरमोल (लेखक, व्याख्याता तथा अभ्यासक फुले शाहू आंबेडकरी विचारधारा) यांनी केले.
सविस्तर वृत्त असे की, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त तेल्हारा येथून जवळच असलेल्या उकळी बु। येथे भव्यदिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची उद्घाटक म्हणून राजूभाऊ भोंगळ (मा. जि.प. उपाध्यक्ष बुलढाणा) हे होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये सौ. आशाताई बोरसे (सरपंच) प्रफुल्ल मानकर (उपसरपंच) रमेश फाळके (पोलीस पाटील) विनोद गव्हाळे (शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष) अनिल तायडे (उपाध्यक्ष) संतोष फाळके (तंटामुक्ती अध्यक्ष) लतीफ भालेराव, गजेंद्र सुलतान (शिक्षक) अमोल व्यवहारे, विठ्ठल गव्हाळे, अजय व्यवहारे इत्यादींची उपस्थिती होती.
सावित्रीबाई फुलेंचे समाजाभिमुख चरित्र व्याख्यानातून मांडताना भिमराव परघरमोल म्हणाले की, फुले दांपत्याने समाजसेवा करताना प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन अनेक कामे केली ज्यामुळे त्यांना समाजाच्या रोशाला बळी पडावे लागले. शेवटी प्लेग रुग्णांची सेवा करतानाच सावित्रीबाईंना मृत्यूने घेरले असे ते म्हणाले.
राजूभाऊ भोंगळ यांनी सांगितले की महापुरुषांच्या कार्य त्यागामुळेच आम्हाला सुखाचे दिवस दिसले. त्यांच्या विचारावर चालणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. त्यानंतर अमोल व्यवहारे यांनीही आपले विचार मांडले. कार्यक्रमाची बहारदार सूत्रसंचालन दीपक तायडे यांनी करून कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जानराव तायडे, गौतम तायडे, रामराव तायडे, राजपाल तायडे यांच्यासह समस्त गावकरी आयोजनात सहभागी होते.



