Uncategorized

उद्या ‘श्रीं’चे मंदिर दर्शनासाठी रात्रभर खुले राहणार

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

श्याम पहूरकर

शेगाव । चालू वर्षाला निरोप व नववर्ष सुरूवातीच्या निमित्ताने लाखो श्री गजानन भक्त ‘श्रीं’च्या समाधी दर्शनाची आस लावून असतात. अशा श्री गजानन भक्तांच्या सोयीसाठी श्री संत गजानन महाराजांचे मंदिर ३१ डिसेंबर रोजी रात्रभर सुरू राहणार आहे. हा निर्णय श्री गजानन भक्तांसाठी नक्कीच आनंददायी आहे.

अनेकजण नवीन वर्षाचे स्वागतानिमित्त श्री संत गजानन महाराजांचे दर्शन घेण्यासाठी उत्सूक असतात. त्याकरिता नववर्षाच्या पुर्वसंध्येला दरवर्षी लाखो भाविक ‘श्रीं’च्या दर्शनासाठी संतनगरीत येतात. त्यामुळे संतनगरीत आलेल्या सर्व भाविकांना ‘श्रीं’च्या समाधी दर्शनाचा लाभ मिळावा व होणाऱ्या गर्दीचे नियोजन योग्य रितीने व्हावे या उद्देशाने मंगळवार, ३१ डिसेंबर रोजी श्री संत गजानन महाराजांचे मंदिर रात्रभर सुरू ठेवण्यात येणार आहे. अशी माहिती श्री ग.म. संस्थानच्या वतीने देण्यात आली आहे. यामूळे रात्री येणाऱ्या भाविकांना पहाटे ‘श्रीं’चे दर्शन घेऊन नवीन वर्षाची सुरूवात करता येणार आहे.

श्रीं’च्या भाविकांसाठी संस्थानच्या वतीने दर्शनबारी व श्रीमुख दर्शनबारी, पारायण मंडप, श्रींची गादी तसेच औदुंबर दर्शनाची व्यवस्था केली आहे. तसेच भक्तांच्या सोयीसाठी संस्थानच्या भक्त निवासामध्ये नियमानुसार अल्पदरात राहण्याची व्यवस्था नित्याप्रमाणे सुरू आहे. संपूर्ण मंदिर परिसरात स्वच्छता ही भक्तांना ‘श्रीं’च्या प्रति आपली आस्था प्रसन्न मनाने एकरूप करणारी आहे. भक्तांना कोणताही त्रास होवू नये यासाठी ‘श्रीं’चे . सेवेकरी आपली सेवा देण्यास तत्पर आहेत. तरी सर्व श्रींच्या भक्तांनी नोंद घ्यावी

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button