मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणाच्या विविध मागण्यासाठी तहसीलदार यांना निवेदन. मुक्ताईनगर प्रतिनिधी .

महाराष्ट्र राज्य शासनाने मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना अंतर्गत निवड केलेल्या प्रशिक्षणा र्थीची मुदत वाढ मिळावी व विविध मागण्यांसाठी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण वतीने तहसीलदार गिरीष वखारे, निवेदनावर मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण सचिन झनके, आकाश जाधव, संदीप हल्लाळे,मनोज निकम, स्वप्निल पाटील, रवींद्र वाघमारे, अश्विनी झनके, जितेंद्र खोंदले, इतर प्रशिक्षणार्थी,उपरोक्त संदर्भीय शासन निर्णय अनुषंगाने सविनय पुर्वक अर्ज व विनंती सादर करतो की, महोदय आपण महाराष्ट्र राज्य पातळीवर सुरु केलेल्या “मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने” अंतर्गत आमची प्रशिक्षणार्थी म्हणून निवड झालेली आहे व निवड झालेल्या आस्थापनेवर योजनेच्या ठराविक कालावधीत आम्ही सर्व प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेत आहोत. आजपावेतो प्रशिक्षण कालावधी दरम्यान आम्हाला शासकीय कामकाजाच्या विविध बाबींचे सखोल मार्गदर्शन व प्रशिक्षण मिळत आहे. या योजनेच्या माध्यमातून आम्हाला शासनाची कार्यप्रणाली जवळून समजुन घेण्याची संधी मिळाली आहे. त्यासाठी आम्ही सर्व प्रशिक्षणार्थी महाराष्ट्र शासनाचे आभारी आहोत
परंतु आमच्या आस्थापनेचे सखोल ज्ञान व कामकाज समजून घेण्यासाठी हा सहा महीण्याचा कालावधी खुप कमी पडत असुन तो वाढवण्यात यावा हि नम्र विनंती. तसेच या योजने अंतर्गत दिलेले प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर आम्हाला शैक्षणिक पात्रतेनुसार कायमस्वरूपी शासकीय सेवेत रुजू करून घ्यावे. कारण प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर इच्छुक उमेदवार ज्या ठिकाणी काम करत असतील त्यांना तिथेच कायमस्वरूपी नौकरी/रोजगार मिळेल असे प्रचारार्थ तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब व मा. कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा साहेब यांनी म्हटलेले आहे.
तसेच महाराष्ट्र शासनाच्या ९ जुलै २०२४ च्या जीआर मधील योजनेच्या स्वरुपातील ४.५ क्रमांकाच्या ओळीमध्ये नमूद आहे की, प्रशिक्षण पुर्ण केलेले उमेदवार संबंधित उद्योग, आस्थापना यांना योग्य वाटल्यास व उमेदवाराची इच्छुकता असल्यास त्यांना रोजगार देण्याच्या दृष्टीने संबंधित आस्थापना निर्णय घेऊ शकतील. त्यामुळे प्रशिक्षार्थीच्या संदर्भात शासनाने तसा निर्णय घेण्यासंबंधी आस्थापना यांना आदेशीत करुन न्याय देण्याची प्रक्रिया सुरु करावी म्हणजे प्रशिक्षण कालावधीला जोडुन नौकरी किंवा रोजगार देण्याच्या दृष्टीने व्यवस्था होईल.
या व्यतिरिक्त सदरील योजनेच्या अनुषंगाने आमच्या काही प्रमुख मागण्या आहेत;
- या योजने अंतर्गत प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर सर्व प्रशिक्षणार्थीचा सेवेचा कालावधी वाढवुन सर्वांना सेवेत सामावून घ्यावे.
- प्रशिक्षण कालावधी नंतर शैक्षणिक अहर्तेनुसार शासकीय कर्मचारांच्या मुळ वेतनाच्या किमान ५०% इतके मानधन करण्यात यावे,
- शासकीय आणि निमशासकीय नौकारांना प्रासंगिक रजा, वैद्यकीय रजा आहेत त्या आम्हालाही देय असाव्यात.
- वेगवेगळ्या परीक्षांच्या माध्यमातून जी शासकीय नौकर भरती होते, त्या भरती प्रक्रियेत प्रशिक्षणार्थीसाठी १०% राखीव जागा ठेवाव्यात तसेच अंशकालीन करण्याबद्दल विचार करण्यात यावे.
महोदय आम्ही विश्वासाने आपणास विनंती करतो की, आपण या योजनेचा हेतु यशस्वीपणे पुर्ण करून आमच्या भविष्याची दिशा निश्चित करावी तसेच महाराष्ट्र शासनाच्या वतीने आमच्या वरील सर्व मागण्या मंजूर करून प्रशिक्षणार्थीना न्याय मिळवुन देण्यास सहकार्य करावे व महाराष्ट्राला अधिक विकसित तथा गतिशील बनवण्यासाठी आम्हाला योगदान देण्याची संधी द्यावी.



