श्री गणेश विद्यामंदिर दातिवली दिवा या शाळेत वार्षिक क्रिडा महोत्सव संपन्न

दिवा – ( सचिन शेलवले )श्री गणेश विद्या मंदिर दातिवली दिवा या शाळेत दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा दिनांक 11/12/2024 पासुन सलग तीन दिवस वार्षिक क्रिडा महोत्सव इयत्ता १ ली ते ७ वी पर्यंत आयोजित करण्यात आला . विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अभ्यासक्रमा व्यतिरिक्त त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी वार्षिक किडामहोत्सव आयोजित करण्यात आले . इयत्ता १ली ते २ री च्या छोट्या खेळाडूंना त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी त्यांचे कौतूक करण्यासाठी त्यांच्या पाठीवर शाबासकीची छाप देण्यासाठी संस्थेचे सचिव साईनाथ म्हात्रे , केतकी म्हात्रे तसेच अनिल भोईर सर हे उपस्थित होते . लहान मुलांसाठी लंगडी, चमचा लिंबू, बूक बॅलन्स, संगीत खुर्ची हे खेळ घेण्यात आले . सर्व मुलांनी खेळात आवर्जुन उपस्थिती दाखविली . प्रत्येक मुलांनी प्रत्येक खेळात आपल्या कलेचे प्रदर्शन दाखविले . सर्व मुलांनी खेळात प्रथम, व्दितिय , तृतीय आलेल्या खेळाडुंचे मनभरून टाळ्यांच्या गजरात स्वागत केले .



