Uncategorized

राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत रावेरचा डंका!

अमरावतीतील शालेय स्पर्धेत रावेरच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी; तब्बल ७ पदकांची कमाई

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
आवाज न्यायाचा
रावेर ता. प्रतिनिधी – विकास आमोदकर

रावेर : अमरावती येथे सुरू असलेल्या राज्यस्तरीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेत रावेरच्या खेळाडूंनी आपल्या दमदार कामगिरीची छाप उमटवत तब्बल ७ पदकांची कमाई केली आहे. सरदार जी. जी. हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, रावेर तसेच सौ. कमलाबाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन केले.

जळगाव जिल्हा वेटलिफ्टिंग संघटनेच्या खेळाडूंनीही स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्राचा नावलौकिक वाढविला आहे.

पदकविजेत्या खेळाडूंची कामगिरी

१. आदित्य चौधरी – द्वितीय क्रमांक
२. प्रथमेश मानकर – द्वितीय क्रमांक
३. सौरव महाजन – द्वितीय क्रमांक
४. वैष्णवी जीवन चौधरी – तृतीय क्रमांक
५. प्राची राजेश तायडे – तृतीय क्रमांक
६. मानस महाजन – तृतीय क्रमांक
७. कृष्णा माने – तृतीय क्रमांक

याशिवाय जागृती जितेंद्र लोणारी हिने चौथा क्रमांक मिळवत उल्लेखनीय कामगिरी केली.

मार्गदर्शकांचे मोलाचे योगदान

या सर्व खेळाडूंना योगेशदादा महाजन यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच क्रीडा शिक्षक जे. के. पाटील सर, युवराज माळी सर आणि अजय महाजन सर यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.

मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव

खेळाडूंनी मिळविलेल्या या उल्लेखनीय यशाबद्दल रावेर शिक्षण संवर्धक संघाचे अध्यक्ष देवेंद्र मिसर, चेअरमन संतोष शेठ अग्रवाल, सचिव अक्षय अग्रवाल, उपाध्यक्ष डॉ. राजेंद्र आठवडे, पदसिद्ध संचालक राजेंद्र शेठ अग्रवाल, संचालक विकास देशमुख, तुषार मानकर, उज्ज्वल अग्रवाल, विजय लोहार, महेश अत्रे यांच्यासह दोन्ही शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच जळगाव जिल्हा वेटलिफ्टिंग संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सर्व पदकविजेत्या खेळाडूंचे अभिनंदन केले.

रावेरच्या खेळाडूंनी राज्यस्तरीय स्पर्धेत केलेल्या या शानदार कामगिरीमुळे शाळांसह जळगाव जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. खेळाडूंच्या या यशामुळे भविष्यात रावेरमधून आणखी गुणवंत वेटलिफ्टर घडण्याची अपेक्षा व्यक्त होत असून, मान्यवरांनी सर्व खेळाडूंना त्यांच्या पुढील क्रीडा वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button