महाराष्ट्रविदर्भसंपादकीय

[येत्या पाच वर्षात संविधान बदलून हुकूमशाही येणारच.]

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी

काल श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांची निवड झाल्या नंतर त्यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून सांगितलेल्या भाषणामध्ये येत्या पाच वर्षांमध्ये देशात लोकशाही व संविधान राहील याची गॅरंटी वाटत नाही असे धोकादायक विधान केले. देशात लोकशाही व संविधानाच्या विरोधात केंद्रात व अनेक राज्यात आरएसएस प्रणित भाजपची सत्ता आहे. भाजपच्या गोळवलकर,हेगडेवार व त्यांच्या वरिष्ठ सर्व पदाधिकाऱ्यांचं संविधानाला, लोकशाहीला व तिरंगा झेंड्याला विरोध आहे. भारतामध्ये पुन्हा एकदा ब्राह्मण्य शाहीचा उदय झाला पाहिजे.यासाठी ते रात्रंदिवस छत्रपती शिवरायांच्या राज्यापासून प्रयत्न करत आहेत. शिवरायांना व छत्रपती संभाजी महाराजांची हत्या करून त्यांनी पेशवाईच्या माध्यमातून ब्राह्मणी सत्ता स्थापन केली होती; परंतु पुढे भीमा कोरेगावच्या युद्धाच्या माध्यमातून सिद्धनाक योद्ध्याच्या 500 सैनिकांनी ही पेशवाई नष्ट करून नाईलाजाने इंग्रजांची सत्ता या देशात आणली होती. पेशवाईच्या काळामध्ये बहुजन समाजाला संपत्ती ठेवण्याचा,शिक्षण घेण्याचा, सरकारी नोकरीमध्ये न ठेवण्याचा निर्णय घेतल्यामुळे, या देशातील दलित,आदिवासी, कुणबी, ओबीसी या सर्व जातींची अवस्था अतिशय दयनीय झालेली होती. हे सर्व अधिकार इंग्रजांनी बहुजन समाजाला दिले पाहिजेत या अटीवर सिद्धनाक महार नावाच्या योद्ध्याने इंग्रजांना पेशव्यांना हरवण्यासाठी पाठिंबा दिलेला होता.त्यामुळे इंग्रजांनी शिक्षणाचा, सरकारी नोकरीत घेण्याचा व जातीय व्यवस्था नष्ट झाली पाहिजेत यासाठी भारतामध्ये प्रयत्न केला.त्यामुळे पुढे रामजी बाबा,डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर,महात्मा फुले,शाहू महाराज यांसारखे समाज सुधारक शिकले व त्यांनी ब्राह्मणी व्यवस्थेच्या विरोधात काम करून बहुजन समाजाला अधिकार व न्याय मिळवून देण्याचे काम केले;परंतु ब्राह्मणी व्यवस्थेच्या विरोधात इंग्रज भारतातील अस्पृश्य वर्गाला म्हणजेच दलित, आदिवासी, बहुजन समाजाला अधिकार देत आहेत. ही गोष्ट ब्राह्मणी व्यवस्थेचे पुरस्कर्ते असलेले महात्मा गांधी व त्यांच्या चेल्याचपाट्यांना सहन झाली नाही. त्यामुळे त्यांनी भारतातील भोळ्या भाबड्या बहुजन समाजाची माथी भडकावून इंग्रजांची सत्ता या देशातून हाकलून लावली; व स्वातंत्र्याच्या नावाखाली भारतातील पहिल्या 1952 साली झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 80 टक्के ब्राह्मण खासदार निवडून आणून पुन्हा एकदा या देशात ब्राह्मणी व्यवस्था चोर पावलांनी निर्माण करण्यासाठी प्रयत्न चालू केले. ब्राह्मणी व्यवस्थेचे पुरस्कर्ते महात्मा गांधी यांची ही चाल विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी ओळखली; म्हणून त्यांनी त्यांच्या ज्ञानाच्या जोरावर संविधानाच्या माध्यमातून सर्व अधिकार भारतातील अस्पृश्य असणाऱ्या दलित, आदिवासी व ओबीसी वर्गाला देऊन एखादा देव देणार नाही इतके उपकार या जातींवर केले; परंतु स्वतंत्र भारतात या सर्व जाती आंबेडकर यांचे उपकार विसरले आणि पुन्हा एकदा खाटकाला शेळीधार्जीण या म्हणीप्रमाणे पुन्हा एकदा या ब्राह्मणी व्यवस्थेच्या नादी लागून अथांग परिश्रमातून बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाचं स्वतःच्या हाताने वाटोळ करीत आहेत. व आपल्या अधोगतीला स्वतःच्या हाताने आपल्या घरात आमंत्रित करीत आहेत.

बहुजनांचे अधिकार काढण्यासाठी ब्राह्मणी व्यवस्थेचे पुरस्कर्ते असलेले काँग्रेस व भाजप या पक्षांना
संविधानाचा अडसर आहे;म्हणून त्यांनी सत्तेत पण ब्राह्मणी व्यवस्थाच राहिली पाहिजे व विरोधात देखील ब्राह्मणी व्यवस्थाच राहिली पाहिजे यासाठी स्वतंत्र्या पासून प्रयत्न चालू करून त्यांनी ते यशस्वी देखील केलेले आहेत.
त्यामुळे या भाजप व काँग्रेसने बाबासाहेब आंबेडकरांनी बहुजन समाजासाठी निर्माण केलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सारख्या पक्षांना मोठे होऊ दिले नाही. बाबासाहेबांच्या पक्षातील दलाल नेत्यांना या ब्राह्मणी पक्षाने विकत घेतले व आंबेडकरांचा पक्ष या देशात मोठा झाला नाही पाहिजे. यासाठी आटोकात प्रयत्न केले.या दोन्हीही पक्षांनी आंबेडकर घराणं सत्तेत आले नाही पाहिजे. यासाठी वाटेल ते प्रयत्न आपल्या डोळ्यात देखत करताना आपण पाहिले आहेत.
मागील लोकसभेमध्ये श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी काँग्रेस सोबत युती करण्याचा भरपूर प्रयत्न केला तरी देखील काँग्रेसने वंचित सोबत युती केली नाही.श्रद्धेय प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसला 7 ठिकाणी पाठिंबा दिला तरी देखील काँग्रेसने अकोल्यामध्ये आंबेडकरांच्या विरोधात आरएसएस च्या माणसाला उमेदवारी दिली व त्यांना पाडण्याचे पाप केले. तुम्ही जर गेली 10 वर्षापासून राजकारणाचा अभ्यास केला तर तुम्हाला दिसून येईल की महाराष्ट्रात भाजपची सत्ता असताना विरोधी पक्षाचा नेता असलेले राधाकृष्ण विखे पाटील व अजित पवार हे दोघेही आज भाजप सोबत आहेत.
याचाच अर्थ असा की या राज्यातील व देशातील सत्ताधारी व विरोधक देखील ब्राह्मणी व्यवस्थेला पूरक विचारधारा असणारेच असायला पाहिजेत. ही व्यवस्था या देशातील काँग्रेस व भाजपने मिळून ठरवलेली आहे. या देशातील संविधान हटल पाहिजे त्यासाठी नरेंद्र मोदींनी नवीन संसदेमध्ये राजशाहीचे व हुकूमशाहीचे प्रतीक असलेला सिम्बॉल(singol) आणून ठेवला आहे.आणि या देशात हुकूमशाही आली पाहिजेत त्यासाठी या दोन्हीही पक्षांनी मिळून प्रयत्न चालू केलेले आहेत.परवाच बातमी वाचली की माजी राष्ट्रपती असलेले रामनाथ गोविंद या दलित राष्ट्रपतींनी “वन नेशन वन इलेक्शन”हा प्रस्ताव केंद्र सरकारला दिला होता. तो प्रस्ताव मोदी सरकारने परवा दिवशी स्वीकारला आहे. त्याचे कायद्यात रूपांतर झाले पाहिजे यासाठी येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये ते संसदेत ठेवून मंजूर केले जाणार आहे. यामुळे सर्वसामान्य माणूस या देशात निवडणूक लढू शकत नाही. अशी परिस्थिती निर्माण होणार आहे; व हे हुकूमशाही व संविधान नष्ट करण्यासाठी टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे.

संविधान हे या देशातील मुस्लिम व दलित समाजासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून ठेवले आहे. ही चुकीची अफवा आरएसएस, भाजप व काँग्रेस भारतातील इतर समाजामध्ये पसरवत आहे. त्याचे एक मूर्तीमंत उदाहरण म्हणजे काल दिनांक 10 डिसेंबर 2024 रोजी भाजपने सर्व आमदारांना त्यांच्या त्यांच्या तालुक्यांमध्ये बांगलादेशमध्ये हिंदू वर झालेल्या अत्याचाराला विरोध करण्यासाठी संपूर्ण भारतामध्ये मोर्चे काढले, परंतु याच भाजपच्या कार्यकर्त्यांनी आपल्याच भारतातील मनिपुर राज्यात आदिवासी समाजाच्या महिलांची नग्न धिंड काढून त्यांच्यावर बलात्कार केले.
त्यांची घरंदार जाळली. आरएसएस प्रणित विचारधारेच्या हिंसक जमावाने पोलिसांकडून मिलिटरी कडून शस्त्रे हिसकावून ताब्यात घेऊन निश्र आपल्याच देशातील बांधवांवर बेछूट गोळीबार गोळीबार करून हजारो आपलेच भारतवासीय मारले. यासाठी यांनी मोर्चे काढले नाहीत. उलट मणिपूर मधील घटना दाबण्याचा आटोकाठ प्रयत्न केला.आजही भारताचा प्रधानमंत्री मणिपूरला त्या आदिवासी बांधवांना भेटण्यासाठी किंवा तो अन्याय अत्याचार दूर करण्यासाठी गेलेला नाही. विशेष म्हणजे भाजपची सत्ता मणिपूरमध्ये आहे काल परभणी मध्ये बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधामध्ये आरएसएस व भाजप प्रणित संघटनांनी मोर्चा काढला होता दिवसा ढवळ्या या मोर्चातील एका मोर्चा कराने बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर संविधान फाडून टाकले हे मोर्चातीलच काही दलित तरुणांनी बघितले व त्याला जाग्यावर चोप दिला हे मोर्चे फक्त इथल्या बहुजन समाजातील जनतेवर आपला धाक ठेवण्यासाठीच काढले होते आणि संविधानाशी छेडछाड केली तर काय परिणाम होतील याची पडताळणी करण्यासाठी कालची परभणी येथील घटना घडली आहे.त्यामुळे जे आरएसएस प्रणित भाजपसोबत गेलेले दलित,आदिवासी, मुस्लिम मातंग संघटना, पक्ष व पुढारी असतील त्यांनी या गोष्टीपासून धडा घेऊन त्यांच्यापासून अलिप्त होऊन आपली स्वतंत्र राजकीय ताकद निर्माण केली पाहिजे.
अन्यथा येत्या पाच वर्षात मोदी सरकार या देशात संविधान बदलून हुकूमशाही आणल्याशिवाय राहणार नाही. कारण ईव्हीएम मशीनच्या माध्यमातून ते मतं मिळवून सत्ता काबीज करत आहेत. त्यांना या देशातील मतदारांचे काहीच देणे घेणे नाही, म्हणून या आरएसएस प्रणित भाजप राक्षसाचा जीव ईव्हीएम मशीन नावाच्या पोपटामध्ये आहे. ते ईव्हीएम मशीन बंद झाले पाहिजेत यासाठी देशातील जनतेने राजकीय व्यवस्थेच्या विरोधात जसा श्रीलंकेमध्ये उठाव झाला होता तसा उठाव करण्याची गरज आहे.
1) अजूनही जनता जागी झाली नाही तर ज्या पद्धतीने शिवराय व छत्रपती संभाजी महाराजांची हत्या करून ब्राह्मणी व्यवस्थेने पेशवाई निर्माण केली.
2) ही पेशवाई नष्ट करण्यासाठी सिद्धनाक नावाच्या महार योद्ध्याने 818 सालीभीमा कोरेगाव या ठिकाणी पेशवाई संपवली व छत्रपती शिवराय व छत्रपती संभाजी राजांची हत्या करून त्यांचे राज्य बळकवणाऱ्या ब्राह्मणी पेशवाईचा बदला घेतला..
3) भारतातील अस्पृश्य जातीमधील दलित, आदिवासी, कुणबी व बहुजन समाजाला शिक्षणाचा, संपत्तीचा व माणूस म्हणून जगण्याचा काही प्रमाणात इंग्रजांनी अधिकार दिला. तोही ब्राह्मणी व्यवस्थेचे पुरस्कर्ते महात्मा गांधी यांना देखावला नाही म्हणून त्यांनी स्वतंत्र्याच्या नावाखाली पुन्हा एकदा ब्राह्मणी व्यवस्था भारतामध्ये आणली.परंतु विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या सतर्कतेमुळे त्यांना ही मनुस्मृति व्यवस्था संविधानामुळे लागू करता येईना.

4) आजही पेशवेकालीन नानासाहेब पेशव्यांचा वारसदार देवेंद्र फडणवीस,नरेंद्र मोदींच्या माध्यमातून संविधान बदलून हुकूमशाही आणण्याचा प्रयत्न करीत आहे. या षडयंत्रा मध्ये काँग्रेसचा राहुल गांधी, राष्ट्रवादीचा शरद पवार, बाळासाहेब ठाकरे घराण्याचे उद्धव ठाकरे,राज ठाकरे सारखे ब्राह्मणी व्यवस्थेचे पुरस्कर्ते जोमाने लोकशाही घालवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत; परंतु आजही फक्त बाबासाहेब आंबेडकरांच्या रक्तामुळे म्हणजेच श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या ताकतीपुढे त्यांना भीती वाटत आहे. परंतु आपलेच बावळट, लाचार दलाल,हरामखोर बेईनाम पुढार्‍यांना हाताशी धरून हे मनवादी, मनुस्मृतीचे पुरस्कर्ते संविधान नष्ट करण्यासाठी त्यांना हातभार लावतात याची शोकांतिका वाटते.

[आपल्यावरील अन्याय, अत्याचार रोखण्यासाठी, आपल्याला हक्क,अधिकार देण्यासाठी, पुन्हा छत्रपती शिवाजी,महाराज, छत्रपती संभाजी महाराज,सिद्धनाक महार, किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर,महात्मा फुले, शाहू राजे जन्माला येणार नाहीत. आत्ता सध्या भिमाच रक्त श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर हेच 70 व्या वर्षांमध्ये संविधान व या देशाची लोकशाही टिकली पाहिजे आणि वंचित घटकांना न्याय मिळाला पाहिजेत. यासाठी लढत आहेत.त्यामुळे मनुवाद्यांची साथ सोडा आणि आंबेडकरांच्या रक्ताला साथ द्या.एवढीच विनंती करतो; आणि थांबतो.
जय भीम, जय संविधान.
(अनिलराव जाधव = प्रदेशाध्यक्ष, एकलव्य आघाडी तथा आंबेडकर घराण्याचा शिपाई.)

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button