क्राईम

पतीने पत्नीच्या पोटात चाकू भोसकला

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

श्याम पहूरकर

शेगाव । तालुक्यातील वरखेड खुर्द येथे शेख हातम शेख अब्दुला यांचे घरी लग्न असल्याने शे. मेहबुब शे. अजीज (रा.बर्डे प्लॉट खामगाव, ह.मु. वरखेड खु.) हा पत्नीसह तेथे आला होता. २३ नोव्हेंबर २४ रोजी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास पती-पत्नीमध्ये भांडण झाले. यावेळी शे. मेहबुब शे. अजीज याने पत्नीच्या पोटात चाकु मारून तिला गंभीर जखमी केले. तिला त्वरीत खामगाव येथील सामान्य रुग्णालयात उपचारार्थ भरती केले परंतू प्रकृती उपचाराला साथ देत नसल्यामुळे प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी अकोला रेफर केले.

याप्रकरणी आबिदाबी शे. इसाक रा. बर्डे प्लॉट यांनी काल २४ नोव्हेंबर रोजी शहर पोस्टेला फिर्याद दिली. फिर्यादीवरून पोस्टेमध्ये उपरोक्त आरोपीविरूध्द कलम ११८(२), ३५५ भान्यासं नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पीएसआय मोहन करूटले करीत आहेत.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button