संविधान वाचले तरच देश वाचेल…. अजय सावळे

संविधान वाचले तरच देश वाचेल…. अजय सावळे
मलकापूर प्रतिनिधी :-
फुले शाहू आंबेडकर विचार मंचच्या वतीने ग्राम भालेगाव येथे ७५ वा संविधान दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भालेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते गजानन खर्चे हे होते. तर प्रमुख उपस्थितीमध्ये मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक संदीप काळे, अजय सावळे, प्राध्यापक निकाळजे सर ,आतिश खराटे, सुशील मोरे उपस्थित होते.
यावेळी बोलताना कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक अजय सावळे यांनी संविधानाविषयी माहिती देताना संविधाना देशाचा आत्मा आहे आणि संविधान वाचले तरच देश वाचन असे प्रामुख्याने आपल्या भाषणात सुतोवाच केले. यावेळी पोलीस निरीक्षक संदीप काळे यांनी सुद्धा आपल्या मुख्य मार्गदर्शन करताना संविधानाचे महत्त्व सांगताना संविधानाने जसे अधिकार दिले तसेच कर्तव्य सुद्धा आपल्या भाषणात सांगितले, आणि अमूल्य मार्गदर्शन केले. फक्त प्राध्यापक निकाळजे सर यांनी संविधान निर्माण करताना बाबासाहेबांना किती त्रास सहन करावा लागला याविषयी विषय माहिती दिली. यावेळी मुख्य मार्गदर्शक आतिश खराटे यांनी सुद्धा संविधानाविषयी सखोल मार्गदर्शन केले. तर सामाजिक कार्यकर्ते या कार्यक्रमाचे अध्यक्ष गजानन खर्च यांनी संविधानाचे महत्त्व विशद करताना संविधानाविषयी आपल्या कर्तव्याची माहिती दिली आणि अध्यकशिय समारोप केला.
यावेळी भालेगाव येथील संविधान प्रेमी नागरिक महिला पुरुष आणि आजूबाजूच्या गावातील सुद्धा बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी मुख्य आयोजक भीमराव नेतो ने स्वप्निल भालेराव भगवान घुले मयुरेश खर्चे अमोल भगत अवि सोनवणे सिद्धार्थ कोंगळे संतोष इंगळे या कार्यकर्त्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.



