Uncategorized

पैसे घेण्यासाठी जातो सांगून मलकापुरातील 46 वर्षीय इसम बेपत्ता

मलकापूर (जि. बुलडाणा)

येथील 46 वर्षीय अजय पांडुरंग निळे हे 24 नोव्हेंबर 2024 रोजी घरून बाहेर पडले आणि त्यानंतर त्यांचा अद्याप पर्यंत शोध लागलेला नाही. अजय यांनी घरातून बाहेर पडल्याच्या आधी संजय दांडगे यांच्या दर्पण फोटो स्टुडिओमध्ये पैसे घेण्यासाठी जात असल्याचे सांगितले होते. 10:30 वाजता त्यांनी फोन करून सांगितले की, रात्री 8:30 वाजता पैसे घेऊन घरी परततील. त्यानंतर अजय यांचा फोन बंद आल्याने त्यांचे कुटुंबीय चिंतेत पडले. त्यांनी अनेक ठिकाणी शोध घेतला, मात्र अजूनपर्यंत अजय यांचा काही ठावठिकाणा लागला नाही. त्यामुळे, त्यांच्या नातेवाईकांनी बुलडाणा पोलिस स्टेशनमध्ये मिसिंग रिपोर्ट दाखल केला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button