Uncategorized

प्रकाश भाऊ भारसाकडे यांचा अकोट विधानसभा मतदारसंघात तिसऱ्यांदा दणदणीत विजय , अकोट-तेल्हारा तालुक्यात कार्यकर्त्यांचा जल्लोष !

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस विजय घोडे प्रतिनिधी | हाकेला धावनारा मसिहा प्रकाश भाऊ भारसाकळे यांनी स्वताचेच सगळे जुने रेकार्ड तोडत 93 हजार 338 मते घेऊन तब्बल अठरा हजार हून अधिक मताने महाविकास आघाडीच्या एडवोकेट महेश सुधाकरराव गणगणे यांचा पराभव करत सलग तिसऱ्यांदा दणदणीत विजय मिळवला .दिनांक 23 नोव्हेंबर 2024 रोजी पोपटखेड रोड आकोट येथील कृषी मार्केट मध्ये ह्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी झाली होती . महायुतीचे अधिकृत उमेदवार प्रकाश भारसाकडे प्रचंड बहुमताने विजयी झाल्याची ही वार्ता पदाधिकारी व कार्यकर्त्यांना कळताच अकोट -तेल्हारा तालुक्यात सर्वत्र जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले , प्रत्येक गाव-खेड्यात ढोल ताशांचा गजर , गुलालाची उधळण , फटाक्यांची आतिषबाजी व विजयाचा जयघोष करण्यात आला . ”सबका साथ , सबका विकास” या विचाराने प्रेरित लाडक्या बहीनीकडुन लाडक्या भावाला मतपेटीतुन मिळालेला भरपूर मताचा भरवलेला हा घास आहे . तसेच अकोला पुर्व मधुन सर्वासाठी धावणारे , शेतकऱ्यांच्या समस्या सोडवणारे लाडके महायुतीचे उमेदवार रणधिरभाऊ सावरकर व मूर्तीजापूर

विधानसभा मतदारसंघातील सर्वांचा विश्र्वास असलेला ”आमदार कम, कार्यकर्ता जादा” हरीषभाऊ पिंपळे या तिनही उमेदवारांना मतदारांनी भरगच्च मतांनी निवडुन दिल्याबद्दल हिवरखेड, तेल्हारा- अकोट , मूर्तिजापूर, अकोला तसेच गाव- खेड्यात जल्लोष साजरा करण्यात आला तर हिवरखेड येथे भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिलभाऊ गावंडे , कृष्णाभाऊ तिडके, रमेशभाऊ दुंतोडे, यांचे मार्गदर्शनात रमेशभाऊ , महेद्र भोपळे ,अनिल कराळे , किरण सेदाणी ,शहर अध्यक्ष प्रविन येऊल ,संदीप इंगळे माजी सरपंच विनोद ढबाले दिलीप नाठे, ईसराईल खाॅ ,फरादखाॅन, अहमदभाई , बजरंग तिडके, संजय हिवराळे , एकनाथ भोपळे, रवी मानकर , पत्रकार बाळासाहेब नेरकर, नंदू राठी , सजंय हिवराळे , अन्सारोध्धीन भाई , रवी वाकोडे ईत्यादी भा.ज.पा , शिदे सेना , राॅ.का. महायूतीचे कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत वीजयी रॅली काढन्यात आली असून गावात रॅली मार्गामध्ये कमळ फुल तसेच विविध प्रकारच्या रांगोळ्या काढण्यात आल्या व ठीक ठिकाणी लाडक्या बहिणीकडून कार्यकर्त्यांचे औक्षन करण्यात आले. यादरम्यान देवा भाऊ. प्रकाश भारसाकळेचा विजयाचा जयघोष करत डि,जे,कम बॅड पथकाचे सहाय्याने ही महायुतीची विजयी रॅली काढन्यात आली होती. अडगावला सूद्दा अभि ढगे रावसाहेब गृप तर्फे फटाक्यांचा जल्लोश करन्यात आला . ठाणेदार गजाननजी राठोड यांच्या अखत्यारीत महादेव नेवारे आदींनी परिस्थितीवर नियंत्रण ठेवले होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button