निवडणूक

एरंडोल-पारोळा विधानसभा मतदार संघातून आमदार पुत्र आघाडीवर

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी । एरंडोल व पारोळा मतदार संघातून अमोल चिमणराव पाटील आणि माजी मंत्री सतिश आण्णा पाटील यांच्या जोरदार लढत होत आहे. एरंडोल विधानसभा मतदार संघाच्या पाचव्या फेरी अखेरीस अमोल पाटील यांना 21982 मते मिळाली असून त्यांच्या प्रतिस्पर्धी भगवान पाटील यांना 15767 मिळाली असून माजी मंत्री सतिश पाटील यांना 8500 मते मिळाली आहे.

अधिक माहिती अशी की, एरंडोल विधानसभा मतदारसंघात् यंदा महायुतीच्या वतीने आमदार चिमणराव पाटील यांचे सुपुत्र तथा जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील यांना शिवसेनेने उमेदवारी दिली. त्यांच्या समोर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांना उमेदवारी मिळाली. याच्या सोबत माजी खासदार ए. टी. नाना पाटील यांनी देखील अपक्ष उमेदवारी केली. सोबतच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते संभाजीराजे पाटील आणि धरणगाव येथील मोठे ठेकेदार भगवान महाजन यांनी देखील अपक्ष म्हणून उमेदवारी करत आहे. अमोल पाटील यांना 21982, भगवान पाटील यांना 15767 मिळाली तर माजी मंत्री सतिश पाटील यांना 8500 मते मिळाली आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button