बुलढाणामहाराष्ट्र
ब्रेकिंग न्यूज , वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार दिपकभाऊ रा. बोडखे यांच्या ..

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस विजय घोडे प्रतिनिधी
तेल्हारा दि.17 नोव्हें.| वंचित बहुजन आघाडीचे अकोट-तेल्हारा 28 विधानसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार दिपक रामदासजी बोडखे यांच्या प्रचारार्थ दि. १८ नोव्हेंबर २०२४ रोजी गांधी मैदान अकोट येथे दु. ०३:०० वाजता भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे . वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार दीपक रामदासजी बोडके यांच्या प्रचारार्थ श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आवर्जून उपस्थित राहणार असून ते सर्व मतदार नागरिकांना याप्रसंगी संबोधित करणार आहेत तरी अकोट- तेल्हारा विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदार नागरिकांनी मोठ्या संख्येने या होणाऱ्या भव्यसभेकरिता उपस्थित राहावे असे आवाहन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे.




