महाराष्ट्रविदर्भ
१९जून १९५०मिलिंद महाविद्यालय औरंगाबाद स्थापना दिवसमिलिंद

१९जून १९५०मिलिंद महाविद्यालय औरंगाबाद स्थापना दिवसमिलिंद महाविद्यालया बदल दोन शब्द(स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी शेगाव मिलिंद चराटे)
शिका संघटीत व्हा आणि संघर्ष करा! यासाठी शिक्षणसत्ता केंद्र निर्माण केली कोणत्याही एका जातीधर्मापुरते नसून पिपल्स म्हणजे (लोक जनता) लोकशाही प्रणीत तमाम बहूजन समाजातील अज्ञान दूर करण्यासाठी आणि मनुस्मृतीचे जळमटं नष्ट करुन आत्मनिर्भर आणि शोषण,भयमुक्त समाज निर्मितीसाठी बाबासाहेबांनी उचललेल क्रांतिकारी पाऊल..आज चा दिवस खूप महत्वाचा आहे, कारण की 19 जून 1950 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे औरंगाबाद येथे मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली होती. आज वर्धापनदिन आहे.. त्या निमित्ताने बाबासाहेब आंबेडकर आणि मिलिंद महाविद्यालय यांना त्रिवार वंदन .. गर्व आहे मला कि मि मिलिंद महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे ज्ञानाची ज्योत व जागृतीचा अग्नी अखंड तेवत राहू द्या.



