गुन्हेगारी

५ हजाराची लाच घेताना पकडले रंगेहाथ

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

एरंडोल प्रतिनिधी

अतिरिक्त दिलेल्या बारदानाच्या मोबदल्यात ५ हजार रूपयांची लाच स्वीकारताना येथील शासकीय गोदामाचे मुकादम हमजेखान महेमुदखान पठाण (वय ३९, मुकादम, रा. सय्यद मोहल्ला, एरंडोल) यास ५ हजार रूपयांची लाच स्वीकारताना जळगाव एसीबीने १३ नोव्हेंबर २०२४ रोजी दुपारी १ वाजता रंगेहाथ पकडले. या गुन्ह्यात गोदाम व्यवस्थापक नंदकिशोर रघुनाथ वाघ (वय ४७) यांना सुध्दा आरोपी करण्यात आले आहे. या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे.

४७ वर्षीय तक्रारदार जळगाव यांना शासकीय गोदामामधून बारदान (रिकाम्या गोण्या) विकत घेण्याचे कंत्राट जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडून मिळाले. आरोपी नंदकिशोर वाघ व हमजेखान महेमुदखान पठाण यांनी ७०० अतिरिक्त बारदान त्यांना इच्छा नसताना दिले. त्या बदल्यात ७ हजार रूपयांची मागणी करण्यात आली. पडताळणी कारवाई दरम्यान दोन्ही आरोपींनी अतिरिक्त दिलेल्या दोन्ही आरोपींनी अतिरिक्त दिलेल्या बारदानाच्या मोबदल्यात प्रथम ७ हजार रुपये, ६ हजार रुपये, ५ हजार ५५० रूपयेची मागणी करून तडजोडी अंती ५ हजार रूपयांची मागणी करण्यात आली.

१३ नोव्हेंबर २०२४ रोजी शर्मिष्ठा घारगे वालावलकर पोलिस अधीक्षक ला. प्र. विभाग नाशिक परिक्षेत्र नाशिक, पोलीस उपअधीक्षक योगेश जी.ठाकूर ला.प्र.विभाग जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली दिनेशसिंग पाटील पी एस आय, सुरेश पाटील पी एस आय, पो. काॅ. राकेश दुसाने यांनी सापळा रचून लाचेची रक्कम स्वीकारताना आरोपी हमजेखान महेमुदखान पठाण यास रंगेहाथ पकडण्यात आले. दरम्यान दोन्ही आरोपींना एसीबीच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे ला.प्र.वि.जळगांव ह्या पुढील तपास करीत आहेत.

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी

एरंडोल

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button