Uncategorized

आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हा प्रवक्ते एडवोकेट विनोद इंगळे तसेच तालुका युवा अध्यक्ष अमर बोदडे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिंदे शिवसेनेत प्रवेश एडवोकेट विनोद इंगळे यांची शिवसेना जिल्हा प्रवक्ते पदी नियुक्ती:-

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून वंचित बहुजन आघाडीचे माजी प्रवक्ते एडवोकेट विनोद इंगळे ,युवकचे जिल्हा महासचिव शुभम आसलकर , वंचित बहुजन आघाडीचे युवा तालुकाध्यक्ष अमोल बोदडे, तालुका प्रवक्ते रामदास इंगळे, तालुका सचिव माणिकराव इंगळे, तालुका उपाध्यक्ष उखर्डा बोंबटकर, माजी महासचिव सतीश वाकोडे, तालुका युवा सचिव अशोक इंगळे, सिद्धार्थ बोदडे, एडवोकेट आकाश इंगळे, एडवोकेट धीरज पान पाटील, अभय बोदडे, संकेत बोदडे, धोंडू बोंबटकर, आनंद बोदडे, बाबुराव बोदडे, भूषण शिरसोदे यांच्यासह इतर अनेक पदाधिकारी यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

या प्रवेश सोहळ्याला शिवसेना जिल्हाध्यक्ष समाधान महाजन, आमदार चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती जयपाल बोदडे, वीरेंद्र भोईटे, सुनील पाटील, देविदास पाटील, लीलाधर पाटील यांच्यासह अनेक मान्यवर देखील उपस्थित होते.

प्रवेश सोहळ्यानंतर आयोजित कार्यक्रमात एडवोकेट विनोद इंगळे यांनी आपल्या मनोगतातून आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढले. त्यांनी सांगितले की, चंद्रकांत पाटील यांनी नेहमीच गोरगरीब आणि गरजू लोकांना मदतीचा हात दिला आहे. त्यांच्यासारखा आमदार पुन्हा एकदा या मतदारसंघात निवडून यावा आणि जनतेची सेवा करावी अशी आमची इच्छा आहे. त्यामुळे महायुतीच्या अधिकृत उमेदवार चंद्रकांत पाटील यांना विजय मिळवून देण्यासाठी आम्ही सर्वजण प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहोत.

मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघात अठरापगड 12 बलुतेदार समाजाला घेऊन कार्य करणारा आमदार चंद्रकांत पाटील -विनोद इंगळे

विनोद इंगळे यांनी पुढील मत मांडले की, महायुतीचे चिन्ह आणि विचारधारा जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही गावोगावी कार्यशाळा, प्रचार सभा आणि प्रत्यक्ष घरोघरी जाऊन नागरिकांशी संवाद साधणार आहोत. आमदार चंद्रकांत पाटील यांनी या मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेतले आहेत, आणि याच सेवाभावी वृत्तीमुळे आज आमदार चंद्रकांत पाटील यांचे नाव प्रत्येकाच्या ओठांवर आहे.

सामाजिक विकासात सक्रिय योगदान

चंद्रकांत पाटील यांचे नेतृत्व हे केवळ राजकीय नाही तर सामाजिक, आर्थिक, आणि शैक्षणिक प्रगतीतही मोलाचे योगदान देणारे आहे. त्यांनी या मतदारसंघातील पायाभूत सुविधांवर लक्ष केंद्रित करून रस्ते, पाणी, वीज, आणि शेतकऱ्यांसाठी विशेष योजना राबवल्या आहेत. त्यामुळे पाटील यांचा विजय हा या मतदारसंघाच्या प्रगतीचा एक महत्वपूर्ण टप्पा ठरेल असे विनोद इंगळे यांनी ठामपणे सांगितले.
तसेच पुढे म्हणाले की

शिवसेनेच्या ताफ्यात नव्या ऊर्जा

या प्रवेशामुळे शिवसेनेच्या ताफ्यात नव्या जोमाची भर पडली असून, तरुण नेते आणि विविध क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांचा या मतदारसंघातील प्रचारात सहभाग हे महायुतीच्या पक्षाचे बलस्थान ठरणार आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button