अवैध गुटखा विक्री प्रकरणी कारवाई गुटख्यासह दोन लाख सत्तर हजार चा माल जप्त.

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड
मालेगाव : – पोलीस अधिक्षक, वाशिम यांनी वाशिम उपविभागातील पोलीस स्टेशन अंतर्गत दस्तूरखुद्द पोलीस अधिक्षक, वाशिम यांनी कारवाई पोलिस स्टेशनच्या ठिसाळ कारभाराचे वाभाडे निघाले आहेत.
तसेच दिनांक 06/11/2024 रोजी गुप्त माहिती वरून ग्राम काटा ता.जि.वाशिम येथील इसम नामे अशोक राजेंद्रकुमार बांडे रा. काटा याने त्याचे काटा येथील घरात प्रतिबंधीत गुटख्या पानमसाला साठवणूक करून ठेवलेला असून तो गुटखा पान मसाल्याची अवैधरित्या विक्री करतो अशी माहिती मिळाली.
यावरून वाशीम जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी जातीने सोबत स्टाफ व पंचासह दि. 06/11/2024 रोजी ग्राम काटा येथे अशोक राजेंद्रकुमार बांडे यांचे घरावर रेड करुन घराची घरझडती घेतली असता अशोक बांडे यांचे घरात व त्यांचे ताब्यात पुढील प्रमाणे प्रतिबंधीत गुटखा पानमसाला मिळून आला. 1) पान बहार सूगंधीत सुपारी, 2) विमल तंबाखु पाऊच, 3) विमल पान मसाला, 4) वाह पान मसाला, 5) वाह तंबाखु, 6) बाजीराव गोल्ड पान मसाला, 7) मस्तानी तंबाखु असा एकुण 2,00,745/-रुपये चा प्रतिबंधीत गुटखा, पानमसाला मिळुन आला. सदर प्रतिबंधीत गुटखा, पानमसाला व सदर मालाची वाहतुक करण्या करीता वापरलेली मोटार सायकल किंमत 70,000/-रुपये, असा एकुण 2,70,745/-रुपये चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर अवैध गुटखा, पानमसाला चा व्यवसाय हे अशोक राजेंद्रकुमार बांडे तसेच अंबादास पंढरी सौदागर, वय-35 वर्ष, रा. काटा हे संयुक्तीकरित्या करतात याबाबत निष्पन्न झाल्याने अशोक राजेंद्रकुमार बांडे व अंबादास पंढरी सौदागर यांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन वाशिम ग्रामीण येथे त्यांचे विरुध्द कायदेशिर कारवाई करण्यात आली.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक अनुज तारे, अपर पोलीस अधिक्षक श्रीमती लता फड यांचे मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी नवदीप अग्रवाल, सपोनि. दिनेश शिरेकार, पो. स्टाफ पोहेकॉ. हरिभाऊ कालापाड, नापोकॉ. गणेश बाजड, पोकॉ. स्वप्नील शेळके, पोकॉ. शंकर वाघमारे यांनी केली.



