जळगावा जिल्हामहाराष्ट्र

नवाब मलिक ‘या’ मतदारसंघातून विधानसभेच्या रिंगणात उतरणार, कोणाकडून मिळाला AB फॉर्म?

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस ठाणे जिल्हा प्रतिनिधी प्रफुल्ल पहुरकर दि 29/10/24 मुंबई : येत्या 20 नोव्होंबरला महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक होणार असून विधानसभा निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबर रोजी लागणार आहे. यंदा महाराष्ट्रात एकाच टप्प्यात मतदान होणार असून 22 ऑक्टोबरपासून उमेदवारी जाहीर झालेल्या उमेदवारांना आपला उमेदवारी अर्ज भरता येणार आहे. तर आज 29 ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटी तारीख आहे. अशातच एक मोठी बातमी समोर येत आहे. शिवाजीनगर- मानखुर्द या विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून त्यांना एबी फॉर्म देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून नवाब मलिक यांना वेटिंगवर ठेवण्यात आलं होतं. याच दरम्यान, त्याचं तिकीट पक्षानं नाकारलं असल्याने ते अपक्ष निवडणूक लढण्यावर ठाम होते. तर त्यांच्या मुलीला महायुतीकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button