निवडणूकमहाराष्ट्रमुबई

शिंदे सेनेचे 45 उमेदवार जाहीर,9 मंत्र्यांना पुन्हा संधी.

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस ठाणे जिल्हा प्रतिनिधी प्रफुल्ल पहुरकर दि 24/10/24 मुंबई: भाजपपाठोपाठ शिंदे सेनेने मंगळवारी रात्री उशिरा आपल्या ४५ उमेदवारांची यादी जाहीर केली. या यादीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व मंत्री आणि बहुतांश आमदारांचा समावेश आहे.
मंत्री उदय सामंत यांना रत्नागिरीतून तर त्यांचे बंधू किरण सामंत यांना राजापूरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. दोन्ही बंधू एकाचवेळी विधानसभेत आपले नशीब आजमावतील. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर ही जागा रवी राणा यांच्या पक्षाला हवी होती, मात्र शिंदे सेनेने तिथे अभिजित अडसूळ यांना उमेदवारी दिली आहे. लोकसभेला पराभूत झालेल्या यामिनी जाधव यांना भायखळा इथून तर खासदार रवींद्र वायकर यांच्या पत्नी मनीषा वायकर यांना जोगेश्वरी पूर्वेतून तिकीट देण्यात आले आहे. या यादीत तीन महिलांचा समावेश आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button