बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

इनरव्हील क्लब खामगांवचा स्तुत्य उपक्रम.

इनरव्हील क्लब खामगांवचा स्तुत्य उपक्रम.

स्टार भारत लाइव एक्सप्रेस बुलडाणा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि ऋषिकेश देठेसूर्योदय आश्रम शाळेस दिले ८ सौर पथदिवेइनरव्हील क्ल़ब हे सामाजिक कार्यासाठी सदैव तत्प़र – रंजिता अग्रवालखामगाव इनरव्हील क्लब हे नेहमी सामाजिक कार्यात अग्रसर असते. आपली सामाजिक बांधिलकी जोपासत इनरव्हील क्लब dis -३०३ च्या अध्यक्षा रंजिता अग्रवाल यांनी पुढाकार घेऊन इनरव्हील क्लब खामगांव द्वारा सूर्योदय पारधी समाज आदिवासी आश्रम शाळा सजनपुरी खामगांव येथे ८ सौर पथदिवे बसविण्यात आले. या सौर पथदिव्यांचे आज *इनरव्हील डिस्टीक्ट चेयरमैन शिलाजी देशमुख यांच्या हस्ते व डीस्ट्रीक्ट आइ एस ओ मोनिका झुनझुनवाला यांच्या उपस्थ‍ितीत फित कापून आश्रम शाळेस समर्पित केले* *खामगांव येथील सूर्योदय पारधी समाज आदिवासी आश्रम शाळा असून याठिकाणी सौर पथ दिव्याची आवश्यकता असल्याचे इनर व्हील क्लब खामगांव च्या अध्यक्षा रंजिता अग्रवाल यांना कळताच त्यांनी सदर आश्रम शाळेस भेट देऊन सदरची बाब इनरव्हील क्लब खामगावच्या कार्यकारणी समोर मांडून सौर पथदिवे बसविण्याचां निर्णय घेतला. याबाबत त्यांनी भारतीय जैन संघटना प्रकोष्ठ संगठनच्या सीमा चोपड़ा अध्यक्ष व ममता नाहर सचीव यांच्याशी चर्चा केली. त्यांनी सकारात्मकता दर्शवत उपरोक्त ठिकाणी ८ पथदिवे लावण्यात मोलाचे योगदान दिले. सदरचे सौर पथदिवे समृध्दी सोलर शॉपी खामगांव यांनी पुरविले आहे.*या सौर पथ दिव्यांचे लोकार्पण इनरव्हील डिस्टीक्ट चेयरमैन शिलाजी देशमुख यांच्या हस्ते व डीस्ट्रीक्ट आइ एस ओ मोनिका झुनझुनवाला यांच्या उपस्थ‍ितीत फित कापून आश्रम शाळेस समर्पित करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी इनरव्हील डिस्टीक्ट चेयरमैन शिलाजी देशमुख, डीस्ट्रीक्ट आइ एस ओ मोनिका झुनझुनवाला, प्रेसिडेंट रंजीता अग्रवाल, सेक्रेटरी निधि गर्ग, वाल पेंटीग प्रोजेक्ट चेयरमैन सारिका नवघरे, सोलर लाइट प्रोजेक्ट चेयरमैन विना अग्रवाल, स्वाती अग्रवाल, अनिता गोयनका,कुंजन लोढ़ाया, स्नेहा चौधरी सुर्योदय पारधी समाज आदिवासी आश्रम शाळेचे प्राचार्य राठोड सर व शिक्षक कर्मचारी वृंद यांची उपस्थिती होती.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button