Uncategorized
ढवळे विद्यालयाचे 3 विद्यार्थी विभाग स्तरावर.

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड
मालेगाव : - तालुक्यातील कोंडबा तात्या ढवळे विद्यालय व श्री संत ओंकारगिरबाबा कनिष्ठ महाविद्यालय शिरपूरचे 3 विद्यार्थी जिल्हा स्तरीय मैदानी स्पर्धेत विजयी झालेत.
त्यामुळे त्यांची आता अमरावती विभाग स्तरावर निवड झाली आहे. मैदानी स्पर्धेत यशस्वी होण्याची शाळेची परंपरा अजूनही कायम आहे. या आधीही दरवर्षी विद्यालयाचे विद्यार्थी विभाग व राज्य स्तर स्पर्धे साठी पात्र ठरले आहेत.
युवक सेवा संचालनालय पुणे यांच्या विद्यमाने, जिल्हा क्रीडा कार्यालय वाशिम द्वारा आयोजित जिल्हा स्तरीय मैदानी स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुल वाशिम येथे दि 18 , 19 व 20 ऑक्टोबर रोजी घेण्यात आल्या होत्या या जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत कै कोंडबा तात्या ढवळे विद्यालय व संत ओंकारगीर बाबा कनिष्ठ महाविद्यालय चे 8 विद्यार्थी सहभागी झाले होते त्या पैकी 1) महेश विनोद शेंडे 14 वर्षे वयोगटात थाळीफेक ,
2) आचल कैलास सोमटकर 14 वर्षं वयोगटात थाळीफेक प्रकारात
3) गोपाल एकनाथ वाढे 19 वर्षे वयोगटात थाळीफेक या प्रकारात
वरील तीन्ही विद्यार्थी जिल्हा स्तरावर विजयी झाले आहेत त्यांची अमरावती विभाग स्तर स्पर्धे साठी निवड झाली आहे ही स्पर्धा यवतमाळ येथे 23, 24 व 25 ऑक्टोबर 2024 ला होणार आहे या विदयार्थ्यांनी मिळवलेल्या यशा बद्दल संस्थेचे अध्यक्ष बाळकृष्णजी ढवळे, उपाध्यक्ष शामराव देशमुख, व्यवस्थापक डॉ गजाननराव ढवळे, मुख्याध्यापक अनंत देशमुख, पर्यवेक्षिका सविता रोडे मॅडम, जेष्ठ शिक्षक प्रा सूर्यकांत शेंडे क्रीडा शिक्षक रामेश्वर वाळले , दीपक भालेराव व इतर सर्वच शिक्षकानी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले.



