सतत धार पावसाने गेल्या महिन्यापासून झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन, तीळ उडीद मुगांचे ..मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.. शासनाकडून मदतीची अपेक्षा…

खामगाव. प्रतिनिधी जी.. डी.रोकडे.सततधार पावसाने गेल्या महिन्याभरात झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन उडीद तीळ पिकांचे मोठ्या प्रमाणात झाले आहे. किंबहुना शेतकरी आत्महत्याच्या उंबरठ्यावर आहे त्यामुळे नुकसान झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करून भरीव मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावी. व खामगाव तालुका ओला दुष्काळ म्हणून जाहीर करण्यात यावा. गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीच्या मदतीमध्ये झालेले पंचनामे हे गाव पुढारी व कर्मचारी यांच्या संगनमताने झाले असून खऱ्या अर्थाने नुकसान झालेल्या शेतकरी बांधवांना लाभांपासून वंचित ठेवण्यात आले आहे. तरी सदर बाब लक्षात घेऊन राहिलेल्या शेतकरी बांधवांचे नाव समावेश करून घेण्यात यावे अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने दिनांक 4.10.2024 रोजी उपविभागीय अधिकारी खामगाव यांच्या इमारतीवरून खाली उड्या घेऊ. याची सर्वस्व जबाबदारी प्रशासनाची राहील.. अशा प्रकारचे निवेदन देण्यात आले……



