Uncategorized

नंगारा भवनाच्या लोकार्पण सोहळ्याचे समाज बांधवांनी साक्षीदार बनावे :- श्रावण जाधव

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड

वाशिम : – अखिल भारतीय बंजारा समाजाचे काशीतीर्थ क्षेत्र पोरागड येथे पालकमंत्री मा.ना.संजयभाऊ राठोड यांच्या प्रयत्नाने उभारण्यात आलेल्या नंगारा सांस्कृतिक भवनाच्या लोकार्पण सोहळ्याकरिता भारताचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पोहरागड येथे लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे. तरी समाज बांधव नागरिकांनी दि. 26 सप्टेंबरला उपस्थित राहुन साक्षीदार व्हावे असे आव्हान अखिल भारतीय बंजारा प्रबोधनकार श्रावण जाधव यांनी केले आहे. अखिल भारतीय समाजाचे काशीतीर्थ पोहरागड येथे बांधण्यात आलेल्या नंगारा भवनामध्ये बंजारा सांस्कृतिक व संस्कृतीचे दर्शन भावी पिढीला ज्ञात व्हावे याकरिता सिंधू संस्कृती पासून तर महानायक वसंतराव नाईक यांच्या कार्यप्रणाली पर्यंतचा इतिहास वस्तु रूपाने व मूर्ती रूपाने साक्षात हुबेहूब चित्र साकारण्यात आले आहे. या नगारा भवनांमध्ये पुरातन क्षत्रिय देश रक्षणाचे शस्त्र व लदेनी व्यवसायाचे साहित्य व गोधन गाई बैलांवर केलेला व्यापार साक्षात साकारण्यात आलेला आहे. या तैल चित्राचे ऐतिहासिक दर्शन घडणार आहे. समृद्ध बंजारा संस्कृतीचे प्रतिबिंब उभारण्यात आले आहे.
तसेच कोटी रुपये शासन दरबारी पाठपुरवठा करून बंजारा समाजाचे भूषण पालकमंत्री मा.ना.संजयभाऊ राठोड तीर्थक्षेत्र पोहरागड व उमरीगड तीर्थक्षेत्राचे विकास करून धर्मगुरू रामराव महाराज यांचे स्वप्न साकार केले आहे. व समाजाच्या विविध मागण्या मंजूर करून घेण्यासाठी केंद्र सरकारच्या अनेक विभागाच्या मंत्र्यांना निमंत्रित करून राज्याचे मुख्यमंत्री मा.एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री मा.अजित पवार व राज्य मंत्रिमंडळ उपस्थित राहणार आहे. तरी बंजारा समाज बांधवांनी लाखोच्या संख्येने उपस्थित राहून 26 सप्टेंबरला सकाळी 11 वाजता उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी व या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार व्हावे असे आव्हान अखिल भारतीय बंजारा प्रबोधनकार श्रावण जाधव सर यांनी केले आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button