रफिकउद्दीन एहसानोउद्दीन काझी यांनी बार मालकास जातिवरु शिवीगाळ व मारहाण ; आरोपींविरूध्द गुन्हा दाखल

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
श्याम पहूरकर
शेगाव । येथील आळसणा रोडवरील श्रध्दा बार ॲन्ड
हॉटेलच्या मालकास शिवीगाळ करून मारहाण केल्याची
घटना ११ एप्रिल २०२४ रोजी घडली होती. त्याप्रकरणी
पोलिसांनी काल ९ सप्टेंबर रोजी आरोपींविरूध्द
अॅट्रॉसिटीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
घटनेसंदर्भात फिर्यादी प्रभाकर पहुरकर (५१)
रा. चंद्रलोक सोसायटी शेगाव यांनी शहर पो.स्टे.ला दिलेल्या
तक्रारीनुसार आरोपी रफिकउद्दीन एहसानोद्दीन काझी व वजीरखान सलीमखान दोन्ही रा. मिल्लत
नगर शेगाव हे व दोन अनोळखी इसम ११ एप्रिल रोजी श्रध्दा बार ॲन्ड हॉटेल येथे सकाळी ११
वाजेच्या सुमारास आले व त्यांनी दारूची मागणी केली. त्यावेळी रमजान ईदच्या अनुषंगाने बार बंद
असल्याचे फिर्यादी यांनी आरोपींना सांगितले. त्यानंतर दुपारी दीड वाजता सुमारास हॉटेलमध्ये
काही गिन्हाईक जेवत असताना उपरोक्त आरोपी तेथे आले व फिर्यादीस जातीवाचक व अश्लील
शिवीगाळ करून मारहाण केली. हॉटेलमधील खुर्चा व टेबलांची तोडफोड करून आठ ते दहा
हजारांचे नुकसान केले. तसेच पोलिसांत तक्रार दिल्यास घर तबाह करण्याची धमकी दिली.
फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलिसांनी काल ९ सप्टेंबर रोजी उपरोक्त आरोपींच्या विरोधात कलम ४२७, ३२३, ५०४, ३४ भा.द.वि. सहकलम अ.जा.ज.प्रति. अधिनियम १९८९ कायदा कलम ३ (१) (ठ) (ड) नुसार गुन्हा दाखल केला असून घटनेचा तपास खामगाव उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक नितिन पाटील हे करित आहेत



