विदर्भ मंडळ अधिकारी संघाचे मासिक वेतन अनियमिततेवर धरणे आंदोलन….

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड
मालेगाव : – दि.९ सप्टेंबर रोजी विदर्भ राजस्व निरीक्षक आणि मंडळ अधिकारी संघ नागपूर जिल्हा शाखेच्या वतीने मासिक वेतनाच्या अनियमिततेसह इतर प्रलंबित मागण्यांसाठी तहसील कार्यालय मालेगाव येथे धरणे आंदोलन करण्यात आले मागील दोन वर्षांपासून मंडळ अधिकारी संवर्गाचे मासिक वेतन अनियमित मिळत असल्यामुळे तसेच इतर प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे दुर्लक्ष झाल्यामुळे आंदोलनाचा दुसरा टप्पा आज राबविण्यात आला या आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यांतर्गत विदर्भ राजस्व निरीक्षक संघाने ३० ऑगस्ट रोजी अमरावती आयुक्तांना आंदोलनाची नोटीस दिली होती आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्यात, मालेगाव तहसील कार्यालयात मंडळ अधिकारी नागेशराव घुगे,एन.एम. इंगळे,विजय अवचार,एन.जी.उईके, टी.एस.इप्पर,विजय देशपांडे आणि संजय बोरकर यांनी सहभागी होऊन आपली मागणी मांडली या धरणे आंदोलनास विदर्भ पटवारी संघटनेचे माजी उपविभाग उपाध्यक्ष जगन महाले,उपविभाग अध्यक्ष ना.ना.विढोळे,तलाठी पंडित घुगे, धनंजय राऊत,विजय येल्लारे,अमोल पांडे,अमोल भूरकाडे,दत्तराव घुगे आणि विजय महाकाळ यांनी पाठिंबा दिला मंडळ अधिकारी आणि राजस्व निरीक्षकांच्या मागण्या यामध्ये मासिक वेतन नियमित करणे,पदोन्नतीचे नियम स्पष्ट करणे,तसेच इतर प्रलंबित समस्या सोडवणे यांचा समावेश आहे या मागण्यांकडे शासनाने त्वरित लक्ष न दिल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल,असा इशारा आंदोलकांनी दिला आंदोलनाच्या पुढील टप्प्यात १२ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय आणि १३ सप्टेंबर रोजी आयुक्त कार्यालय,अमरावती येथे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.



