जळगावा जिल्हा

लाडकी बहिण, सरकारला करते त्रस्तभत्तावाढ नाही तरी होमगार्ड बंदोबस्तात व्यस्त

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड

मालेगाव -ः निवडणूक फंडा असलेल्या लाडक्या बहीण योजनेचा परिणाम शासनाच्या इतर योजनांवर पडला आहे, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा वारसांना देण्यात येणारा निधी यावर्षी बंद केला आहे. तर आता होमगार्डसच्या भत्तावाढीला स्थगिती असे परिपत्रक महसूल विभागाने काढले आहे.तरी होमगार्ड मात्र बंदोबस्तात व्यस्त आहेत. यावरून आता लाडक्या बहिणींना पैसे देण्यासाठी सरकारने अनेक योजनांचा अन विभागांचा पैसे थांबवल्याचे आरोपावर जणू शिक्कामोर्तब झाले आहे.
राज्यातील होमगार्डसच्या भत्तावाढीला स्थगिती मिळालीय हे महत्त्वाचं आहेच, पण राज्याची आर्थिक चणचण वाढलीय, ओढाताण करून लाभार्थी योजनांचा खर्च करावा लागतोय, हेदेखील या महसूल विभागाच्या पत्रावरून स्पष्ट होतेय.
होमगार्ड (गृहरक्षक दल) जवानांच्या बरेच दिवसाच्या मागणी नंतर महासमादेशक, होमगार्ड, महाराष्ट्र राज्य, मुंबई. यांनी होमगार्डसच्या विविध भत्त्यांमध्ये वाढ करण्याबाबत. महसूल व गृहविभागास पत्र देऊन मागणी केली होती.पण राज्य सरकारने ही मागणी धुडकावून लावल्याचे त्यांना उलट टपाली कळविल्याने होमगार्ड जवानात नाराजी पसरली आहे.
गृहरक्षक दलाचे महासमादेशक यांना स्पष्ट पणे कळवून जणू या मागणी ला केराची टोपलीच दाखवून दिली आहे. त्यांनी स्पष्ट १) आपले पत्र क्र.मस/कार्या-०३/हो.भ.वा./न.क्र.१/२०२४/३७८, दि.१२.०२.२०२४.
२) शासनाचे समक्रमांकाचे दि. २७.०२.२०२४ रोजीचे पत्र.
३) आपले पत्र क्र. मस/कार्या-०३/हो.म.वा./न.क्र.१/२०२४/१२२५, दि.१७.०६.२०२४.
उपरोक्त विषयाबाबत आपल्या संदर्भाधिन पत्रांस अनुसरुन, राज्यातील होमगार्ड यांच्या विविध भत्त्यांमध्ये वाढ करण्यास मान्यता देण्याची वित्त विभागास विनंती करण्यात आली होती. पण राज्यांच्या वित्त विभागाने ही मागणीच धुडकावून लावली आहे.
सध्या गणेशोत्सव, नवरात्र, दुर्गोत्सव, विजया दशमी ( दसरा), दिवाळी अश्या महत्त्वाचे दिवसात पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून बंदोबस्त करण्यासाठी सदैव तत्पर असलेल्या गृहरक्षक दलाच्या जवानांना सरकारने वाऱ्यावर सोडले आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button