Uncategorized

मुक्ताईनगर आगारातील एस टी वाहक विनोद पालवे यांचा प्रामाणिकपणा पैसे आणि काही साहित्य असलेली पर्स केली हरताळ्याच्या महिलेच्या स्वाधीन

(तालुका प्रतिनिधी प्रमोद सौंदळे)
सविस्तर वृत्त असे की मुक्ताईनगर आगारामध्ये कार्यरत असलेले विनोद भास्कर पालवे वाहक क्रमांक 5182 हे ड्युटी क्रमांक 11 हारताळा करत असताना हरताळयावरून गाडी परत मुक्ताईनगर आल्यानंतर सर्व प्रवासी उतरल्यानंतर त्यांचे लक्ष एका पर्स कडे गेले त्यांनी ती पर्स घेऊन तात्काळ मुक्ताईनगर आगाराचे आगार प्रमुख जे एम बजरे साहेबांना सुपूर्द केली त्या बसमध्ये जवळपास 4900 रुपये, दोन पेन, आधार कार्ड, आणि काही साहित्य असल्याचे त्यांच्या लक्षात आले त्यांनी तात्काळ आधार कार्ड वरून नंदा वासुदेव तळेकर राहणार या महिलेशी संपर्क साधून त्यांना बोलावून घेतले आणि त्यांची पर्स आणि त्या पर्समध्ये सर्व साहित्य त्या महिलेला परत केले सर्व साहित्य मिळाल्यानंतर त्या महिलेने वाहकाचे तसेच उपस्थित कर्मचारी दीपक चौधरी, प्रभाकर मोरे एस पी नायसे, महेश तायडे अशा सर्व कर्मचाऱ्यांचे आभार मानले एस टी वाहक विनोद पालवे यांचे त्या महिलेसह सामान्य जनतेमधून कौतुक केले जात आहे

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button