मालेगाव पोलीस निरीक्षक संजय चौधरी ॲक्शन मोडवर: रिकामटेकड्या टोळ्यांवर कडक कारवाई,महिलांना दिलासा

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड
मालेगाव : – शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तीवर वचक बसवण्यासाठी पोलीस निरीक्षक संजय चौधरी ॲक्शन मोडवर आले आहेत शहरातील विविध चौकांमध्ये आणि गणपती महामार्गावर सायंकाळच्या वेळी पोलिसांचा राऊंड नियमितपणे सुरू आहे विशेषतः रिकामटेकड्या टोळ्या,विनाकारण चौकातील महापुरुषांच्या पुतळ्यांवर बसणारे,तसेच दुकानांवर विनाकारण गटगट करून बसणारे अशा असामाजिक घटकांवर कडक नजर ठेवण्यात येत आहे शहरात चौकाचौकांत विनाकारण गर्दी जमवून बसणाऱ्या टोळ्यांमुळे महिलांना आणि मुलींना त्रास सहन करावा लागत होता टोळ्या तयार करून जोरात हसणे,खिदळणे,गाड्यांचे हॉर्न वाजवून त्रास देणे अशा प्रकारच्या कृत्यांमुळे सामान्य नागरिकांचाही संताप वाढत होता हे सर्व लक्षात घेऊन ठाणेदार संजय चौधरी यांनी रिकामटेकड्या लोकांवर कारवाई सुरू केली आहे पोलीस निरीक्षक चौधरी यांनी स्पष्ट आदेश दिले आहेत की,दुकानांवर विनाकारण बसणाऱ्या टोळ्यांना तातडीने हटविण्यात यावे,आणि दुकानदारांनी अशा रिकामटेकड्या मुलांना दुकानांवर बसू न देण्याचे आदेश दिले आहेत पोलिसांच्या या कडक कारवाईमुळे महिलांना दिलासा मिळाला असून,अशा टोळ्यांवर ताबडतोब कारवाई करण्यात येत आहे शहरातील प्रत्येक चौकात पोलिसांचा वावर वाढवण्यात आला असून,यामुळे गुन्हेगारी वृत्तीच्या टोळ्यांवर मोठा वचक बसला आहे महिलांना आणि मुलींना सायंकाळच्या वेळी सुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून,शहरातील वातावरण आता अधिक शांतीपूर्ण वाटत आहे ठाणेदार चौधरी यांच्या सूचनेनुसार दुकानदारांनीही आता रिकामटेकड्या मुलांना दुकानांवर बसवू नये अशी सक्त ताकीद दिली आहे या तातडीच्या आणि कठोर कारवाईमुळे मालेगाव शहरातील सामान्य नागरिक,विशेषतः महिला आणि मुली,सुरक्षिततेच्या दृष्टीने दिलासा अनुभवत आहेत.



