प्रधानमंत्री श्री.नरेंद्र मोदीजी यांच्या जळगांव दौऱ्यानिमित्त भाजपा तर्फे नियोजन बैठकीचे आयोजन…

प्रधानमंत्री माननीय श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या प्रमुख उपस्थितीत दि.२५ ऑगस्ट २०२४, रविवार रोजी जळगांव येथे “लखपती दीदी” भव्य मेळावा संपन्न होणार आहे. या पार्श्वभूमीवर मेळाव्याच्या नियोजन बाबत जळगांव भाजपा तर्फे मंत्री मा.ना.श्री.गिरीषभाऊ महाजन व केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले असता, त्यांनी भाजपा पक्ष मार्फत करण्यात येणाऱ्या तयारीचा आढावा घेत संबंधित पदाधिकारी व कार्यकर्ते यांना आवश्यक सूचना दिल्या. तसेच जास्तीतजास्त संख्येने उपस्थितीसाठी नागरिकांमध्ये जनसंपर्क करण्याचे आवाहन केले.
यावेळी मंत्री मा.ना.श्री.गिरीषभाऊ महाजन व केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्यासह भाजपा जळगांव पूर्व जिल्हाध्यक्ष श्री.अमोलदादा जावळे, जळगांव पश्चिम जिल्हाध्यक्ष श्री.ज्ञानेश्वरजी जळकेकर, जळगांव महानगर अध्यक्ष सौ.उज्वलाताई बेंडाळे, माजी खासदार डॉ.उल्हासजी पाटील, आमदार श्री.सुरेश (राजूमामा) भोळे तसेच प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थितीत होते.











